आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने तेच केले जे ताे आधीपासून करताेय (भास्कर एक्स्पर्ट)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखवी प्रकरणात चीनने पाकिस्तानची बाजू घेणे हे काही नवे नाही. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. चीन सुरुवातीपासून विशिष्ट रणनीतीने चालत आहे. जेणेकरून भारताची भूमिका मर्यादित राहावी, तसेच स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वही बाधित व्हावे. यासाठी चीनला पाकिस्तान सर्वाधिक अनुकूल देश वाटतो. चिन आणि पाकिस्तानची उद्दिष्टेही बर्‍याच प्रमाणात एकसारखी आहेत. फरक फक्त इतका आहे की, भारताचा बाजार चीनी उत्पादनांनी भरून जावा असे चीनला तर भारताला पूर्णपणे उद्ध्वस्त करावे, असे पाकिस्तानला वाटते.

पाकला वाटते की, भारत आणि चीनमध्ये २०१७ मध्ये युद्ध होईल, ज्याचा सर्वाधिक फायदा पाकलाच होईल. दुसरीकडे, चीनमधील एका थिंक टँकचे म्हणणे आहे की, इतिहासात भारत नावाचा कोणताच देश नव्हता. ती फक्त हिंदुत्वाची कमाल आहे, ज्याच्या अनुयायांनी परस्पर सहभागातून या देशाची निर्मिती केली. हा प्रचार ‘आयएसएस.सीएन’ या वेबसाइटवर काही वर्षांपूर्वी झाला होता. भारताला २० ते ३० तुकड्यांत विभागण्याच्या रणनीतीवर काम करावे, असा सल्ला थिंक टँकने चीन सरकारला दिला होता.

चीनचे हित आणि आशियाच्या विकासासाठी आसामी, नागा, काश्मिरी, तामिळींना मदत करून त्यांची वेगवेगळी राष्ट्रे स्थापली जावीत. याकामी भारताला तोडण्यासाठी त्यांनी बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, भूतानचेही सहकार्य घेण्याची डावपेच आखले आहेत. चायना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फाॅर स्ट्रॅटजिक स्टडीजचे संक्षिप्त रूप सीआयआयएसएस हेच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ते खरे असल्यास चीन बर्‍याच आधीपासून भारताविरुद्ध फुटीरवादी वा अतिरेकी कारवाया करणार्‍या समूहांना रणनीतिक आणि इतर प्रकारची मदत करत आहे. चीननेच पाकिस्तानला अण्वस्त्रसंपन्न देश होण्यास मदत केली. आजही पाकला ते शस्त्रास्त्र व तंत्रज्ञानाचा पुरवठा करत आहेत. त्याचा वापर भारतविरुद्धच होईल, हे चीनला चांगलेच ठाऊक आहे.

चीनला पाकिस्तानात आपली उत्पादने विकणे, प्रकल्प उभारणे व गुंतवणूक करण्यापेक्षा जास्त गरज तेथील लष्कर, कट्टरपंथीय समूह आणि अतिरेकी समुहांना मदत करण्याची आहे. यामुळेक स्वाभाविकरीत्या लखवी असो वा हाफिझ सईद, चीन कोणत्याही प्रकरणात भारताला पाठिंबा देणार नाही.
बातम्या आणखी आहेत...