Home | National | Delhi | China Doklam Indian Army Ordered To Return Their Barracks

भारतीय सैन्याला डोकलाम येथून परत येण्याचे आदेश, एक महिन्यात पूर्ण होणार वापसी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 07:25 PM IST

सिक्किममधील डोकलाम भागात तैनात अतिरिक्त भारतीय सैन्याला गुरुवारी परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 • China Doklam Indian Army Ordered To Return Their Barracks
  डोकलाम भागात तैनात अतिरिक्त भारतीय सैन्याला गुरुवारी परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले
  नवी दिल्ली - सिक्किममधील डोकलाम भागात तैनात अतिरिक्त भारतीय सैन्याला गुरुवारी परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहे. सैनिकांना परत बोलावण्याची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण होईल. चीनसोबत भारताचा डोकलाम भागावरुन 16 जूनपासून वाद सुरु झाला होता. 28 ऑगस्ट रोजी उभय देशांनी या भागातून आपले सैन्य हटवण्याचा निर्णय घेतला होता.
  सीतारमण यांचे चीनी मीडियाने केले होते कौतूक
  - संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी 8 ऑक्टोबर रोजी चीन सीमेशी लागून असलेल्या डोकलाम-नथुला प्रदेशाची पाहणी केली होती. यावेळी सीतारमण यांनी भारतीय परंपरेनुसार चीनी सैनिकांना नमेस्ते केला होता. त्याचा अर्थ सांगितला होता.
  - त्यानंतर चीनी मीडियाने भारतीय संरक्षण मंत्र्याचे कौतूक केले होते. त्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बॉर्डरवर आम्हाला भारतासोबत शांतता हवी असल्याचे म्हटले होते.
  ‘चांगल्या संबंधाचा भारत व चीन या दोघांनाही फायदा’
  भारत हा आमचा महत्त्वाचा भागीदार आहे आणि चांगल्या संबंधामुळे त्याचा दोन्ही देशांना फायदाच होणार आहे, असे चीनने म्हटले होते. दोन्ही देशांतील संबंधाचा फायदा आंतरराष्ट्रीय समुदाय व प्रदेशालाही होणार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.
 • China Doklam Indian Army Ordered To Return Their Barracks
  शनिवारी सीतारमण यांनी नाथु ला पासचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी तिथे तैनात चीनी सैनिकांची भेट घेतली. सीतारमण यांनी त्यांना 'नमस्ते' म्हटले होते

Trending