आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, घूसखोर चीनींना भारतीय सैनिकांनी दिले रसगुल्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर गोळीबाराच्या घटना घडत आहेत, शुक्रवारी रात्रही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. चीनही दुस-या बाजूने भारतामध्ये वेळोवेळी घसखोरी करीत आहे.
दरम्यान, चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. सिक्कीममध्ये 16000 फुटावर ताबा रेषेच्या अलीकडे चिनी सैनिक आले. दोन वाहनांतून पूर्व सिक्कीमलगत आपल्या हद्दीत आल्यानंतर भारतीय जवानांच्या पथकाने हा प्रकार पाहिला. चिनी सैनिकांना भारतीय हद्दीत असल्याचे बॅनर दाखवण्यात आले. उभय देशांनी 2005 मध्ये ही पद्धत ठरवली आहे. चिनी सैनिकांनी परतताना भारतीय जवानांना बीअरची भेट दिली, तर भारतीय जवानांनी रसगुल्ल्याचे पाकिट त्यांना दिले.


अंदाज घेऊन गस्त
भारत व चीनदरम्यान साडेचार हजार कि.मी. लांबीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. त्याची योग्य पद्धतीने मार्किंग झालेली नसल्याने दोन्ही देशांचे सैनिक अंदाज घेऊनच गस्त घालतात.