आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • China Is Ready To Attack With Pakistan, Is Government Alert? Mulayam Singh Asked

पाकसोबत चीनची हल्ल्याची तयारी, सरकार सतर्क आहे? मुलायम सिंह यादव यांचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी संरक्षण मंत्री तसेच सपाचे खासदार मुलायमसिंह यादव यांनी बुधवारी लोकसभेत सरकारला काही प्रश्न विचारले. चीन भारतावर हल्ला करण्यासाठी तयार आहे. मग अशा परिस्थितीत सरकारने नेमकी काय-काय तयारी केली आहे ? असा प्रश्न मुलायम यांनी विचारला. त्याचबरोबर भारताचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान नव्हे तर चीन आहे. चीन आपले सैन्य व शस्त्रासह काश्मीरमध्येही हस्तक्षेप करू लागला आहे, असा दावा मुलायम यांनी केला.

मुलायम पुढे म्हणाले, चीनच्या सैन्याने काश्मीर सीमेजवळ युद्धाचा सराव केला आहे. चीनने पाकिस्तानच्या जमिनीत अणुबाँब लपवून ठेवल्याच्या देखील बातम्या येऊ लागल्या आहेत. सिक्कीम व भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारताची आहे. खरे तर तिबेटला चीनला प्रदेश म्हणून तत्कालीन पंतप्रधानांनी स्वीकारले हीच मोठी चूक झाली. तिबेटीयन लोकांचे अध्यात्मिक गुरू दलाई  लामा यांना देखील सरकार संरक्षण देऊ शकलेले नाही. म्हणून किमान आता तरी भारताने तिबेटच्या स्वातंत्र्याचे समर्थन करायला हवे. चीनच्या संभाव्य हल्ल्याला परतवण्यासाठी लष्कर प्रमुखांची बैठक तत्काळ बोलवायला हवी, असा सल्लाही मुलायम यांनी दिला. एकीकडे चीन भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे.
 
दुसरीकडे मात्र भारताने व्यापारासाठी चीनला आपली बाजारपेठ दिली आहे, या गोष्टी खंत असल्याचे मुलायम म्हणाले. मुलायम यांनी  या अगोदरही लोकसभेत चीनबद्दलची आपली परखड मते व्यक्त केली होती. त्याचा हवालाही मुलायम यांनी बुधवारी सभागृहात दिला. अनेकवेळा याबाबत बोललो आहे. आता चीनबाबत ठोस भूमिका घेण्याची वेळ  म्हणाले. 

आक्षेपार्ह वक्तव्य, सपाचे अग्रवालांकडून माफीही
राज्यसभेत बुधवारी जमावाकडून हत्येच्या प्रश्नावर बोलताना सपा खासदार नरेश अग्रवाल यांनी हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे वरिष्ठ सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले होते. सर्व खासदारांनी त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला होता. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही त्यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अग्रवाल यांनी आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माफी मागतो, असे सांगून सारवासारव केली.
बातम्या आणखी आहेत...