बीजिंग/ नवी दिल्ली - चीनने पुन्हा भारतविरोधी कारवाया सुरू केल्या असून एकीकडे नकाशात अरुणाचल आपलाच भूभाग असल्याचे दाखवत दुसरीकडे भारतीय हद्दीतून (व्याप्त काश्मीर) चीन-पाकिस्तान असा 1800 कि.मी. रेल्वे मार्ग टाकण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, पंचशील तत्त्वांच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त उपराष्ट्रपती हमीद अन्सारी सध्या चीन दौर्यावर आहेत.
अरुणाचलवर दावा सांगणार्या चीनच्या आडमुठेपणावर भारताने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. परराष्ट्र परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता म्हणाला, ‘अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग असल्याचे भारताने यापूर्वीही अनेकदा चीनला बजावले आहे. नकाशात अरुणाचल चीनच्या हद्दीत दाखवल्याने वास्तव बदलणार नाही.’ चीनच्या जवानांनी गेल्या 24 जूनलाही पूर्व लडाखमध्ये सुमारे साडेपाच कि.मी.पर्यंत घुसखोरी केली होती.
(फोटोः चीनच्या हुनान प्रांतामध्ये शुक्रवारी एका प्रिंटीग प्रेसमध्ये आधिकारिक नक्षा तयार करताना कर्मचारी.)