आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Military Might On Upward Trajectory Says Pentagon

काही क्षणातच चीन जिंकू शकते युद्ध ! अमेरिकेला फुटला घाम, भारतालाही इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- चीनकडे जगातील सर्वोत्तम शस्‍त्रे असून लांब पल्‍ल्‍यापर्यंत मारा करणारी क्षेपणास्‍त्रे, स्‍टील्‍थ विमाने आणि अणू हल्‍ला करणारी आधुनिक पाणबुडया आहेत. त्‍याशिवाय चीन सायबर युद्ध करण्‍यासही सक्षम असल्‍याचे समोर आले आहे. इतके सर्व असतानाही चीनने आपले सैन्‍यदल आणखी आधुनिक बनवण्‍याच्‍या दिशेने योजना बनवली आहे. कोणतेही युद्ध काही क्षणांत जिंकता यावे असा चीनचा प्रयत्‍न असल्‍याचा अहवाल अमेरिकन सैन्‍यदलाचे मुख्‍यालय असलेल्‍या पेटांगॉनने दिला आहे. चीन सैन्‍यदलावर मोठया प्रमाणात खर्च करीत असल्‍याचे पेटांगॉनने म्‍हटले आहे. चीनमधील तैवान भागातील जलक्षेत्रात आपली बादशाही राखण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडून मोठयाप्रमाणात प्रयत्‍न सुरू आहेत.

गेल्‍या तीन आठवडयांपासून भारतातील लडाख भागातील सीमावादानंतर चीनने जरी सैन्‍य माघार घेतले असले तरी भारताला सतर्क राहण्‍याची गरज निर्माण झाली आहे. पेटांगॉनने दिलेल्‍या अहवालानुसार वर्षे 1998 पासून आतापर्यंत चीनने सहा शेजारी देशांबरोबरील सीमेसंबंधीतील 11 वाद सोडवले आहेत. चीन आणि भारत यांच्‍यात मागील काही वर्षांमध्‍ये वाढलेल्‍या राजकीय आणि आर्थिक संबंधानंतरही 4,057 किलोमीटर लांबीच्‍या सीमेवरील तणाव अजून कायम आहे. अरूणाचल आणि अक्‍साई चीन भागावरून तणाव आहे. यावरून चीनने कडक भूमिका घेतली आहे. वर्षे 2009 पासून दोन्‍ही देशांनी आपापल्‍या दाव्‍यांवर जोर देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

चीनकडे 79 मोठया युद्धनौका आणि 55 सबमरीन आहेत. यातील पाच सबमरीनवर अणवस्‍त्रे वाहून नेण्‍याची क्षमता आहे. त्‍याचबरोबर चीनने भारतीय सीमांवर जास्‍त लक्ष दिले आहे. अणवस्‍त्रे हल्‍ला करण्‍याची क्षमता असलेली चीनची नवी पाणबुडी 'लियोओनिंग'वर 7400 किलोमीटरपर्यंत मारा करण्‍याची क्षमता असलेले जेएल-2 क्षेपणास्‍त्र तैनात करण्‍यात आले आहे.