आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • China Says 53 Indian Troops Still Present At Doklam Indian Army Wants Status Quo

डोकलामला चीनचा भाग मानत नाही; तो भाग आमचाच! भूतानचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली- डोकलामला चीनचा भाग मानण्यास आपण तयार झालो असल्याचे वृत्त भूतानने स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. सिक्कीमजवळील डोकलाम भाग चीनचा मानण्यास भूतान तयार झाला आहे, असा दावा  चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी केला होता.  

डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यात सुमारे दोन महिन्यांपासून तणातणी सुरू आहे. भूतानच्या सरकारी सूत्रांनी सांगितले की, ‘डोकलाम मुद्द्यावर आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. तुम्ही आमची भूमिका २९ जून २०१७ रोजी भूतान परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित वक्तव्यावरून समजून घ्यावी.’  

भूतानने कूटनीतिक माध्यमांचा वापर करत, ज्या भागात भारत आणि चीनचे लष्कर परस्परांसमोर उभे आहे तो भाग आपला नाही, असा संदेश चीनला पाठवला आहे, असा दावा सीमा वाद प्रकरणाशी संबंधित चीनच्या एक ज्येष्ठ मुत्सद्दी वांग वेनली यांनी केला होता. जूनमध्ये हा वाद सुरू झाला होता. त्यावर भूतानने एक प्रसिद्धिपत्रक जारी केले होते. त्यात म्हटले होते की, डोकलाममध्ये रस्ते बांधणीचा प्रकरण म्हणजे दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सीमा कराराचे उल्लंघन आहे. दोन्ही देशांदरम्यान १९८८ आणि १९९८ मध्ये लेखी करार झाला आहे. दोन्ही देश सीमेबाबत अंतिम करार होईपर्यंत शांतता ठेवण्याबद्दल सहमत होते. चीन आणि भूतानच्या सीमेवर मार्च १९५९ च्या आधीची स्थिती कायम ठेवण्याबद्दल सहमती झाली होती. चीन डोकलाममध्ये १६ जून २०१७ च्या आधीची स्थिती जैसे थे ठेवेल, अशी अपेक्षा भूतानने व्यक्त केली होती.

चीन डोकलामवर समझोता करणार नाही 
चीनच्या तज्ज्ञांच्या मते, डोकलाम वाद संपवण्यासाठी चीन कुठलाही समझोता करणार नाही. वरिष्ठ कर्नल झाओ बे म्हणाले की, डोकलाममध्ये भारतीय लष्कराच्या उपस्थितीमुळे चीन सरकार, लष्कर आणि जनता नाराज आहे. आम्ही या प्रकरणाला घुसखोरी संबोधले नाही, ही आमची सद्भावना आहे. चीन सरकार आणि लष्कराला कुठलाही समझोता करण्याची इच्छा नाही. भारताच्या लष्कराने विनाअट डोकलाममधून माघार घ्यावी, यातच दोन्ही देशांचे हित आहे. लष्करी विज्ञान अकादमीचे संचालक झाओ शियाओझाऊ यांनी म्हटले आहे की, जर भारताचे लष्कर हटले नाही तर या प्रकरणाचा तोडगा लष्करी कारवाईद्वारेच निघेल. या दोन्ही तज्ज्ञांच्या मते, भारत आणि चीन यांनी सिक्कीम भागात नवा सीमा करार करावा. हा करार १८९० च्या ग्रेट ब्रिटन-चीन कराराची जागा घेऊ शकेल.

चीनची खोडसाळ कारवाई : अमेरिका खासदार राजा कृष्णमूर्ती यांचे मत  
अमेरिकेचे संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी सिक्कीममध्ये सीमेवर निर्माण झालेल्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, चीनच्या खोडसाळ कारवाईमुळे परिस्थिती बिघडली आहे. 
बातम्या आणखी आहेत...