नवी दिल्ली- भारतासोबतचे संबंध खराब होण्यामागे फॉरेन मीडिया जबाबदार असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनचे शासकीय माध्यम ग्लोबल टाइम्समध्ये यासंदर्भातील एक लेख प्रकाशित झाला आहे. गेल्या महिन्यात विशेष प्रयत्नानंतरही भारताला न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी) मध्ये सदस्यत्व मिळाले नव्हते. त्यासाठी भारताने नाव न घेता चीनला दोषी ठरवले होते. ग्लोबल टाइम्सने आणखी काय लिहीले..
- ग्लोबल टाइम्सच्या माहितीनुसार, 'चीनवर आरोप ठेवले जातात की, दक्षीण चायनाच्या समुद्रावर ताबा मिळवण्याचा उद्देश हा हिंद महासागरवर नजर ठेवण्याचा आहे. मात्र, हे धादांत खोटे आहे.'
- 'फॉरेन मीडिया भारत आणि चीनमधील सीमा प्रश्न आणि संरक्षण संबंधामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त रस घेत आहे. तर, दोन्ही देशातील आर्थिक सहकार्य किंवा कित्येक उपलब्धींकडे फॉरेन मीडियाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.'
- 'B&R' या शिर्षकाखाली हा लेख लिहिण्यात आला आहे. यामध्ये असेही म्हटले की, भारताने चीनच्या बेल्ट अॅन्ड रोड (B&R) इनीशिएटिव्हला सपोर्ट केला आहे.
मोदींवरही ठेवला होता आरोप..
- ग्लोबल टाइम्सने नरेंद्र मोदींवर आरोप लावला होता की, चीनबाबत त्यांची वृत्ती सकारात्मक नाही.
- ग्लोबल टाइम्सने सोमवारी लिहीले होते की, 'भारतीय रणनीतिकार आणि सरकारला वाटते की, सिल्क रूटसाठी चीनने जियोस्ट्रॅटिजिक डिजाइन बनवले आहे.'
- 'पण आमचे म्हणने आहे की, 'बेल्ट अॅन्ड रोड' प्लॅटफॉर्म दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाचा दुआ आहे.'
- "भारतीय मीडिया मेंबरशिप न मिळाल्याने एकट्या चीनवर आरोप करत आहे. आम्हाला भारतविरोधी आणि पाकचे समर्थक सांगितले जाते." असे अग्रलेखात लिहीले आहे.