आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही देशात घुसल्यास ‘भयंकर गोंधळ’ माजेल, डोकलामवर चीनची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनने भारतालाच धमकी देत आम्ही घुसल्यास भयंकर गोंधळ उडेल असे म्हटले आहे. - Divya Marathi
चीनने भारतालाच धमकी देत आम्ही घुसल्यास भयंकर गोंधळ उडेल असे म्हटले आहे.
बीजिंग - डोकलामप्रश्नी चीन अडेलतट्टूपणा सोडायला तयार नाही. उलट हा दावा फेटाळताना चीनने भारताला धमकी दिली आहे. चिनी सैन्य भारतात घुसल्यास ‘भयंकर गोंधळ’ उडेल, असे चीनच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे.
 
सीमेजवळील रस्त्यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो हा भारताचा दावा ‘हास्यास्पद आणि द्वेषपूर्ण ’ असल्याचेही चीनने म्हटले आहे. दुसरीकडे या भागातून भारत सैन्य माघारी घेत नाही तोपर्यंत मार्ग निघू शकत नाही, असा पवित्रा चीनने घेतला आहे. त्यामुळे लवकरच तोडगा निघेल, चीन सकारात्मक पाऊल उचलेल, ही गृहमंत्री राजनाथ सिंह यांची अपेक्षा धुडकावण्यात आली.  भारताच्या सैन्याने बेकायदा सीमा आेलांडली असल्याचा आरोप चीनने  पुन्हा केला. एवढेच नव्हे तर डोकलाम भागातील रस्त्यांचे बांधकाम थांबवण्याची मागणीदेखील अत्यंत मूर्खपणाची आहे.
 
उलट्या बोंबा : लडाखसह अरुणाचल प्रदेशाजवळ चीनच्या सातत्याने हालचाली वाढल्या आहेत. त्यामागे चीनची साम्राज्यवादी आक्रमकता दिसून येत आहे. सीमेवर बांधकाम करण्याचा निर्लज्जपणा करणाऱ्या चीनने आम्ही शांतता राहावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. परंतु सार्वभौमत्व व एकात्मतेला धोका निर्माण होत असताना मात्र आम्ही गप्प राहू शकत नाही, अशा उलट्या बोंबाही चीनचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी मारल्या आहेत. 
 
लडाखमध्ये दगडफेक  
१५ ऑगस्ट रोजी लडाखमध्ये सीमेवर किरकोळ दगडफेकीची घटना घडली होती. त्यात भारत आणि चीन अशा दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले होते. त्यामुळे सीमेवर तणावाची स्थिती पाहायला मिळाली होती.  
 
बातम्या आणखी आहेत...