नवी दिल्ली - चिनी माेबाइल कंपन्यांनंतर सरकारने अाता चीनचे सर्वात लाेकप्रिय सर्च इंजिन यूसी ब्राऊझरवर बंदी अाणण्याची तयारी सुरू केली अाहे. त्यादृष्टीने सरकारी प्रयाेगशाळेत त्याची तपासणीवजा चाैकशी सुरू अाहे. यात या माध्यमातून डाटा लीक हाेत असल्याचे अाढळून अाल्यास या सर्च इंजिनवर बंदी अाणली जाऊ शकते.
हैदराबादस्थित सी-डेक संस्थेकडून यूसी ब्राऊझरची तपासणी सुरू अाहे. या तपासणीत हे सर्च इंजिन काेणत्या प्रकारचा डाटा लीक करत आहे, हे पाहिले जात अाहे. भारतात सुमारे ५ कोटी वापरकर्ते आहेत. एका अंदाजानुसार भारतातील स्मार्टफाेनवर ५५ टक्के नागरिक यूसी वापरतात.
चिनी व्हर्जनमधून डाटा लीक....
गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या मते, २०१५मध्ये युनिव्हर्सिटी अाॅफ टाेरंटाेच्या सिटीजनने केलेल्या तपासणीत यूसीच्या चिनी व्हर्जनमधून डाटा लीक हाेत असल्याचे अाढळून अाले हाेते. वाय-फायद्वारे यूसी वापर हाेत असेल, तर फाेनचा मॅक पत्ता, एसएसअायडी व वाय-फायचा मॅक पत्ता हे वाय-फायचे विवरणदेखील सर्व्हरकडे पाठवले जात असल्याचे निदर्शनास अाले होते.