बीजिंग/नवी दिल्ली - भारतात 2022 मध्ये सुरु होणाऱ्या बुलेट ट्रेनची कोनशिला गुरुवारी ठेवली जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधी चीनने या मुद्द्यावर निवेदन केल आहे. भारतात हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी चीन मदतीस तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे याआधीही चीने अशी ऑफर दिली होती, मात्र या प्रकल्पासाठी भारताने चीने ऐवजी जपानला महत्त्व दिले आहे. गुरुवारी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची कोनशिला ठेवली जाणार आहे. त्याचवेळी चीनकडून आलेल्या मदतीच्या आवाहनाला भारताने अद्याप कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.
काय म्हणाले चीन
- चीन त्यांच्या हायस्पीड रेल्वेची सध्या मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी त्यासाठीचे कँपेनही चालवले.
- 2014 मध्ये देशात मोदी सत्तेत आले तेव्हा त्यांनी बुलेट ट्रेन सुरु करण्याच्या घोषणेला पुर्णत्वास आणण्याच्या दिशेने काम सुरु केले. त्यानंतर हा प्रकल्प आपल्याला मिळावा यासाठी चीनने लॉबिंगही सुरु केली.
- नवी दिल्ली ते चेन्नई या हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आपल्याला मिळावा यासाठी चीनने खूप प्रयत्न केले होते. अजूनही त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले आहेत. मात्र भारताकडून त्यांना कोणतेच उत्तर मिळालेले नाही.