आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वोत्तरच्या दहशतवादी संघटनांना चीनची मदत, फोनवरील संवादाचे पुरावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याच्या वेळी हिंदी-चिनी भाई-भाईचा नारा दिला जात होता, परंतु या वेळीही हाती दगाच आला आहे. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अहवालानुसार पूर्वाेत्तर राज्यांत दहशतवादी संघटनांना चीन फूस लावत आहे. त्यांना एकजूट होण्यासाठीच चीन मदत करत आहे, असे नव्हे तर त्यांना पैसा व शस्त्रास्त्रेही चीनकडून पुरवली जात आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चीन म्यानमारमधील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची मदत घेत आहे.
पूर्वोत्तर राज्यात सुरक्षा दलांना हाताशी धरून अशांतता पसरवण्याचा चीनचा कट आहे. त्यामुळेच तेथे दहशतवादी संघटनांकडून सुरक्षा यंत्रणेवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी त्यांनी खापलांगमध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांना एकजूट केले आहे. गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेही त्यांचाच हात होता. म्यानमारच्या कांचीनमध्ये निवृत्त कर्नल पीएलए मूल्याननाही याच कामी नेमले होते. चीन या संघटनांना थेट निधी उपलब्ध करून देत आहे. त्यांच्या कारखान्यात तयार झालेली शस्त्रे देत आहे. त्याचा वापर दहशतवादी भारतविरोधी कारवायांमध्ये करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार दहशतवादी परेश बरुआ हा चीनमध्ये आहे.

त्याला म्यानमारच्या कर्नलसोबत मिळून भारतात पूर्वोत्तर राज्यांत घातपाती कारवाया करण्यासाठी कट रचण्याचे निर्देश चीनने िदले आहेत.

गुप्तचर विभागाकडे टेप
दोन चिनी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत मंत्री परिषद व आंतरमंत्रालय गटाची बातचीत सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडली आहे. त्यात पूर्वोत्तर राज्यात अशांतता पसरवण्यावर चर्चा झाल्याचे लक्षात येते. यात म्यानमारच्या निवृत्त कर्नलला कोणते निर्देश दिले जावेत यावरही चर्चा झाली. दहशतवादी संघटनांना भारत सरकारसोबतची शस्त्रसंधी मोडून सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी चिथावणी दिली जात आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून (पीएलए) दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवली जात असल्याचा खुलासाही या टेपमधून झाला आहे.