आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनची दादागिरी, लडाखमध्ये पेंगांग खोर्‍यात घुसखोरीचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेह/ नवी दिल्ली - पंचशील तत्त्वांच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त एकीकडे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी चीन दौर्‍यावर आहेत. तर दुसरीकडे चीनने भारताचा या काळात सलग तिसर्‍यांदा विश्वासघात केला. अरुणाचल चीनचा भाग असल्याचे नकाशात दाखवून चीनने हक्क सांगितला होता. नंतर व्याप्त काश्मीरमधून थेट पाकपर्यंत रेल्वेमार्गाची तयारी चीनने सुरू केल्याचे स्पष्ट झाले. आता लडाखमध्ये पेंगांग खोर्‍यात चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर येत आहे. या भागात भारतीय जवान सज्ज असल्याने चिनी सैनिक पळून गेले. 27 जूनला हा प्रकार घडला.

27 जूनला घडले काय? : या दिवशी लेहपासून 168 किमी अंतरावर पेंगांग सरोवराच्या क्षेत्रात चिनी जवानांनी घुसखोरी केली. पेंगांग खोर्‍यानजीक सुमारे 45 किलोमीटरची सरहद्द भारताला लागून आहे. तर 90 किमी किनारपट्टी चीनच्या हद्दीत आहे. 27 जूनला चिनी सैनिक भारतीय हद्दीत दाखल झाले होते. दोन्ही देशांचे जवान समोरासमोर आल्यानंतर दोन्ही बाजूंनी ध्वज फडकावत या भूभागावर आपलाच ताबा असल्याचे दोन्ही बाजूंनी दावे केले. थोड्या वेळाने भारतीय जवानांची आक्रमकता पाहून चिनी सैनिक परतले.
(फोटो - वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेच्या वृत्तपत्रातात हा नकाशा प्रसिद्ध झाला आहे.)