आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरूंनी आम्हाला कमी लेखले, मोदींनी मात्र ही चूक करू नये: डोकलामवर बरळला चीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या सरकारी माध्यमाने मंगळवारी म्हटले की, जर डोकलाम वादावर भारताने चीनच्या इशाऱ्या गांभीर्याने घेतले नाही, तर बीजिंगला प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचलावी लागतील. माध्यमाने असेही म्हटले की, भारताने 1962 च्या युद्धाचा धडा विसरता कामा नये. नेहरूंनी चीनला क्षुल्लक समजले होते, परंतु मोदींनी आमच्या वॉर्निंगला नजरेआड करू नये.
 
-सिक्कीम सेक्टरमध्ये भूतान ट्रायजंक्शनजवळ चीन एक रस्ता बनवू इच्छितो आणि भारत याला विरोध करत आहे. तब्बल 2 महिन्यांपासून या परिसरात भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आहेत. चीनने भारताला म्हटले की, या परिसरात आपल्या सैनिकांना भारताने त्वरित माघारी बोलवावे, परंतु भारताने याला ठाम नकार दिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...