आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Yechury Takes On Bilawal Over Kashmir Issue

बिलावल यांनी चीनमध्ये काश्मीर मुद्दा उपस्थित करताच येचूरींना फटकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टोंनी जेव्हा चीनमध्ये काश्मीर मुद्या उपस्थित केला तेव्हा भारतातील डावा पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख सीताराम येचुरींनी त्यांना तिथेच फटकारले. येचुरींनी बिलावल यांना इशारा देत म्हटले, काश्मीरसारखा मुद्या आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित करणे टाळले पाहिजे. बीजिंगमध्ये आयोजित एशियन पॉलिटिकल पार्टीजच्या विशेष अधिवेशनासाठी येचूरी गेले आहेत. या अधिवेशनाला भाजप आणि काँग्रेसच्या वतीनेही एक शिष्टमंडळ गेले आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

काय म्हणाले बिलावल
एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानूसार, गुरुवारी रात्री चीनमध्ये झालेल्या अधिवेशनात बिलावल म्हणाले, 'आमच्या काश्मीर'ला विकसित करण्यात (अर्थात पीओके- पाकव्याप्त काश्मिर) चीनने मोठी भूमिका बजावली आहे.

येचूरींनी कसे फटकारले
बिलावल यांना सडेतोड उत्तर देत येचूरी म्हणाले, 'पाकिस्तानी शिष्टमंडळाने काश्मीरसारखा मुद्या या मंचावर उपस्थित केला आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचा सामयिक मुद्या आहे. द्विपक्षिय मुद्दा आहे. जगानेही हे मान्य केले आहे. या दोन्ही देशांवरच हा मुद्या सोडला पाहिजे. तुम्ही आंतरराष्ट्रीय मंचावर त्याला उपस्थित करुन तो सुटणार नाही उलट अधिक जटील होईल.' बीजिंगहून इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेससोबत केलेल्या बातचीतमध्ये येचूरींनी याला दुजोरा दिला आहे.