आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Army Again Made Incursion In Ladakh Area

चीनच्‍या लष्कराची पुन्‍हा घुसखोरी, शिवीगाळ करुन भारतीय सैनिकांचे कॅमेरे तोडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- चीनच्‍या सैनिकांनी पुन्‍हा एकदा लडाखमध्‍ये घुसखोरी करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. सैनिकांनी दौलत बेग ओल्‍डी सेक्‍टरमध्‍ये चुमुर भागात प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली. चीनी सैनिकांनी भारतीय सैन्‍यातर्फे लावण्‍यात आलेले हाय रिझॉल्‍यूशन कॅमे-यांची तोडफोड केली. तसेच काही अस्‍थाई बांधकामही तोडले. चीनच्‍या सैनिकांनी एप्रिलमध्‍ये घुसखोरी केली होती. त्‍यावेळी भारत आणि चीनमध्‍ये तणाव निर्माण झाला होता. गेल्‍याच आठवड्यात संरक्षण मंत्री ए. के. एंटोनी चीनच्‍या दौ-यावर गेले होते. त्‍यानंतर लगेचच चीनने घुसखोरी केली आहे.

या घटनेसंदर्भात गुप्‍तचर खात्‍याने केंद्र सरकारला अहवाल सादर केला आहे. इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांनीही (आयटीबीपी) या घटनेस दुजोरा दिला आहे. अहवालातील माहितीनुसार, 17 जूनला ही घटना घडली. चीनच्‍या सैनिकांनी स्‍थानिक लोकांशी हिंदीमध्‍ये जागा सोडण्‍याचे आदेश दिली. या सैनिकांना अतिशय चांगली हिंदी येत होती. ही जागा आमची असून तुम्‍ही निघून जा, असे या लोकांना ठणकावून सांगितले. चीनी सैनिकांनी यावेळी शिवीगाळ गेल्‍याचीही माहिती आहे.