आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chinese Army Helicopters Violated Indian Airspace In Uttarakhand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी भेटीनंतर तीनच दिवसांत चीनी हेलिकॉप्टर भारतीय हवाई हद्दीत, 10 मिनीट घातल्या घिरट्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनने भलेही मोदी सरकारसमोर मैत्रीचा हात पुढे केला असला तरी, त्यांनी त्यांची चाल सोडलेली नाही. चीनने पुन्हा एकदा भारतीय सीमेत घुसखोरी केली आहे. घुसखोरीची ताजी घटना 12 जूनची आहे. चीनचे एक हेलिकॉप्टर उत्तराखंडच्या जोशीमठ येथे आले होते. विशेष म्हणजे, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तीनच दिवसांनी ही घटना घडली होती.
जोशीमठापर्यंत आत आले होते हेलिकॉप्टर
उत्तराखंडमध्ये तैनात एका वरिष्ठ अधिका-याने आयटीबीपीला पाठवलेल्या अहवालानुसार, 12 जून रोजी एक हेलिकॉप्टर चमोली जिल्ह्यातील जोशीमठापर्यंत आले होते. हे हेलिकॉप्टर लाइन ऑफ कंट्रोलच्या (एलओसी) 30 किलोमीटर आत घुसले होते. हेलिकॉप्टरने तिबेट सीमा सुरक्षा पोलिसांच्या पोस्टवर जवळपास 10 मिनीट घिरट्या घातल्या होत्या.
30 एप्रिललाही घडली होती अशी घटना
चीनने याच वर्षी 30 एप्रिल रोजीही हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. गेल्या वर्षी चीनी लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मीचे हेलिकॉप्टर लद्दाखच्या चुमार भागात भारतीय हवाई हद्दीत घुसले होते. तेव्हा भारत आणि चीन दरम्यान एलओसीवर शांतता प्रस्थापित करणे आणि वाद थांबवणे यावर एकमत झाले होते. त्यामुळे आताच्या घटनेने हे वाद थांबले आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे.