आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संबंध सुधारण्यासाठी चिनी परराष्ट्र मंत्री १२ रोजी भारत भेटीवर येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी १२ ऑगस्ट रोजी तीन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी ते द्विपक्षीय, प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर विचारविनिमय करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, वांग-स्वराज यांच्यात १३ ऑगस्ट रोजी द्विपक्षीय चर्चा होईल. चीनच्या हवांग झाऊमध्ये सप्टेंबरमध्ये जी-२० परिषद व गोव्यात ब्रिक्स संमेलन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांत चर्चा अपेक्षित आहे. अलीकडेच दक्षिण कोरियात अणु पुरवठादार गटाच्या बैठकीत चीनने भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला होता. जम्मू-काश्मीरच्या घटनेनंतरही भारत-चीन यांच्यात तणावात वाढ झाली होती. त्यामुळे उभय देशांत त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.

दोन्ही देशांत नियमित चर्चा : वांग यांची भारत भेट दोन्ही देशांतील नियमित उच्चस्तरीय चर्चेचाच एक भाग आहे. वांग यापूर्वी जून २०१४ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मार्च-एप्रिल २०१५ मध्ये चीनचा दौरा केला होता.
भारतीय हद्दीत चीनचा रस्ता नाही : पर्रीकर
चीनने भारतीय सीमेत कोणत्याही प्रकारचा रस्ता तयार केलेला नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेत स्पष्ट केले आहे. भारत-चीनच्या सीमेला लागून ७३ रस्ते आहेत. ६१ रस्त्यांची निर्मिती २०१२ मध्ये बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने केली होती.
बातम्या आणखी आहेत...