आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगनच्या भीतीमुळे युद्धसरावातून भारताची माघार; घुसखोरीचा थांगपत्ता नाही?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- चिनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीच्या भीतीमुळे अमेरिका आणि जापानसोबत होणार्‍या नौदलाच्या युद्धसरावातून भारताने माघार घेतली आहे. गुआम द्वीपवर हा युद्धसराव होणार होता. परंतु गेल्या महिन्यात चिनी सैनिकांनी लद्दाखमध्ये घुसखोरी केली होती. त्यामुळे भारत सरकारने या युद्धसरावातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

अमेरिका आणि जपानचे नौदलाचे अधिकारी या त्रिपक्षीय युद्धसरावासंदर्भात चर्चा करण्‍यासाठी गेल्या महिन्यात भारतात आले होते. परंतु अमेरिका, जपान आणि भारत यांच्यात संयुक्त युद्धसराव होत असल्याने चीनचा तीळपापड झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या ड्रॅगनने भारत, अमेरिका आणि जपान यांच्या होणारे संयुक्त युद्धसराव थांबवण्यासाठी तिन्ही देशांना खुलेआम आव्हानही दिले होते.

ड्रॅगनचा फुत्कार पाहून भारतीय संरक्षण मंत्रालयाने जपानमधील ओकिनावा द्वीपावर युद्धसराव करण्याची अट ठेवली होती. त्यानंतर मात्र चिनी सैनिकाच्या घुसखोरीमुळे निर्माण झालेला तणाव लक्षात घेता. युद्धसराव हा दोन देशातच व्हावा, अशीही भूमिका आता भारताने घेतली आहे. त्यामुळे या युद्धसरावातून भारताने माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या या भूमिकेमुळे अमेरिकन अधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहे.

दरम्यान, चिनी सैनिकांनी 10 एप्रिल रोजी भारतात घुसखोरी केली होती. परंतु भारत सरकारला त्याचा काही एक थांगपत्ता नव्हता. चिनी सैनिकांनी 15 एप्रिलला घुसखोरी केली होती, असे भारत सरकारचे म्हणणे आहे. चिनी सैनिक भारताच्या हद्दीत असताना भारताला त्याचा थांगपत्ता नसल्याच्या वृत्तमुळे खळबळ माजली आहे. भारत सरकारकारच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.