आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन हल्ल्याच्या तयारीत, भारतीय अधिकार्‍यांनी घेतला सुरक्षेचा आढावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुकंपाने हदरलेल्या चीनकडून भारतात घुसखोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 16 जुलैला झालेल्या घुसखोरीच्या ताज्या घटनेनंतर भारत सरकार सीमारेषेवर अतिरिक्त सैनिक तैनात करण्याच्या विचारात आहे. भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांनी लद्दाखमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविली आहे.

चीनच्या सततच्या घुसखोरीमुळे मुख्य विरोधीपक्ष भाजपने काँग्रेसवर तोफ डागली आहे, तर काँग्रेसने चीनने असे करु नये असे म्हटले आहे. संरक्षण विषय तज्ज्ञांनी चीन भारतावर हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, जवळपास 100 चीनी सैनिक एलओसी पार करून भारतीय हद्दीत घुसले होते. त्यांच्या हातांमध्ये बॅनर होते आणि त्यावर लिहिलेले होते, की "ताब्यातील जमीन सोडून परत जा !"

संरक्षण तज्ज्ञांच्या मतानुसार चीन भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. भारत सध्या अंतर्गत वादात अडकलेला असल्याची माहिती चीनला आहे.
संरक्षण तज्ज भारत वर्मा म्हणाले, की जोपर्यंत चीनच्या कारवायांवर कडक कारवाई केली जात नाही तोपर्यंत त्यांची घुसखोरी सुरुच राहाणार आहे. चीनला माहित आहे, की भारतात सध्या राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आहे. सध्या भारत हल्ला करण्याच्या किंवा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारी नाही.

सततची घुसखोरी

11 जुलैला चुमार सेक्टरमध्ये दोन चीनी हेलिकॉप्टर भारतीय हवाई हद्दीत घुसले होते.
17 जूनला याच भागात चीनी सैनिकांनी घुसघोरी केली.
15 एप्रिलला चीनी सैनिकांनी लद्दाख मधील दौलत बेग ओल्डी भागात घुसखोरी केली होती. ते भारतीय सीमेत जवळपास 10 किलोमीटर आत घुसले होते.