आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार; भारताविरोधात शरिफ यांनी तयार केला खतरनाक प्लॅन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मिरमधील पूँछ येथे पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरु आहे. भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिका-यांनी शनिवारी या घटनांना दुजोरा दिला आहे.

लष्करातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूँछ सेक्टरमधील शाहपूर भागात भारतीय चौकीवर आज (शनिवार) सकाळी सातच्या दरम्यान गोळीबार करण्यात आला. भारतीय सैनिकांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यात कोणीही जखमी असल्याची माहिती नाही.

या महिन्यात चारवेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. याआधी २२ जुलैला पाकिस्तान सैन्याने पूँछ सेक्टरमध्येच एका चौकीवर गोळीबार केला होता.

काश्मिरवरुन उठसूठ वाद निर्माण करणा-या पाकिस्तानने आता लपूनछपून वार करण्यास आणि काश्मिरविरोधी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याची माहिती भारताच्या गृहमंत्रालयाला देखील आहे. ते सध्या या घटनांवर लक्ष्य ठेवून पाकिस्तानचे नेकमे काय सुरु आहे हे समजून घेत आहे. मात्र, एक गोष्ट निश्चित आहे, की पाकिस्तान पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करून पाठीत वार करण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मागील कार्यकाळात त्यांनी काश्मिरला मुख्य मुद्दा बनविले होते, आता ही त्यांनी काश्मिरच्या मुद्यावर रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, पाकिस्तानातील पीपीपीच्या सरकारने काश्मिरला विशेष महत्त्व दिले नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, शरीफ यांची पाकिस्तान मुस्लीम लिग आता त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पंजाब प्रांतात दहशतवादी संघटनांना मोकळेरान करून देणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या पक्षात आता काश्मिर सेल सुरु करण्यात येणार आहे. ज्याचे मुख्य कार्य हे काश्मिरमुद्यावर अफवा पसरवणे आणि हा मुद्दा चर्चेत ठेवणे आहे.


शरीफ यांच्या रणनितीचा दुसरा भाग आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचाराचा आहे. आयएसआयला सांगितले गेले आहे की, काश्मिर मुद्यावर लंडन, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, टोरांटो येथे सक्रीय प्रचार सेल सुरु करण्यात यावे. मात्र, त्यांचे संचालन आयएसआय मार्फत किंवा पाकिस्तानी दुतावसाऐवजी एनजीओ आणि काश्मिर सपोर्ट ग्रुप यांच्या माध्यमातून केले जाईल. त्यांना संघटीत करण्याचे आणि आवश्यक ते साहित्य व माहिती पुरविण्याचे काम आयएसआय करेल.

पाकिस्तान सरकारमधील यंत्रणांना भारतविरोधी वक्तव्य करण्यापासून दूर राहाण्यास सांगण्यात आले आहे. दुसरीकडे जिहादी नेता हाफिज मोहम्मद सईद याला भारतविरोधी प्रचार आणि वक्तव्य सुरुच ठेवावेत अशा सुचना दिल्या गेल्या आहे. हाफिज सईदच्या वक्तव्यापासून सरकार कायम स्वतःला अलिप्त ठेवेल. काश्मिरमध्ये घुसखोरी कमी करुन तिथे हाणा-या हल्ल्यांना स्थानिक रंग देण्याचे काम केले जाईल. भारतीय लष्कराकडून झालेल्या कारवाईला एनजीओ आणि माध्यमे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जातील. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरुन भारतावर दबाव टाकला जाईल आणि काश्मिरला कायम पेटते ठेवता येईल.