आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियावर हल्ल्याची पूर्ण तयारी, किम जोंगने दुसरा मार्ग शोधावा: ट्रम्प यांची उघड धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग/वॉशिंग्टन - नॉर्थ कोरियाशी सुरू असलेल्या वादादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी या देशाला उघड धमकी दिली. ट्रम्प म्हणाले, या प्रकरणावर लष्करी उपाय करण्याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. सर्व बाबी तयार आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की आता किम जोंग उन (उत्तर कोरियाचा हुकूमशहा) हे नक्कीच यापेक्षा वेगळा मार्ग शोधतील.
-तत्पूर्वी, अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यान वाढलेल्या तणावावर चीनने भाष्य केले की, जर अमेरिकेने उत्तर कोरियावर हल्ला केला तर यात आम्ही नक्कीच दखल देऊ.
 
उत्तर कोरियाला बजावले
- वृत्तसंस्थेनुसार ट्रम्प म्हणाले की, जर उत्तर कोरिया अमेरिकेवर काही कारवाई केली तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. उत्तर कोरियाने त्यांच्या चिथावणीखोर हरकतींना वेळीच आवर घालावा, अन्यथा अशा संकटात सापडेल, जे खूप कमी देशांच्या वाट्याला आले आहे. ट्रम्प म्हणाले की, चीन उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर खूप काही करू शकतो.
- दरम्यान, नॉर्थ कोरियाच्या अणु कार्यक्रमाला वाढवण्याच्या धोरणामुळे संयुक्त राष्ट्राने त्याच्यावर नवे आर्थिक निर्बंध लावले आहेत.
 
उत्तर कोरियाने आम्हाला घाबरले पाहिजे
ट्रम्प यांनी न्यू जर्सीच्या बेडमिंस्टर स्थित आपल्या समर व्हेकेशन होममध्ये मीडियाशी गुरुवारी चर्चा केली. त्यांना अमेरिका उत्तर कोरियावर अगोदर परमाणू हल्ला करेल का? हे विचारल्यावर ट्रम्प म्हणाले की, मी याबाबत बोलणार नाही, मी कधीच असे वक्तव्य केलेले नाही. परंतु जर उत्तर कोरियाने आमच्यावर, आमच्या एखाद्या मित्रदेशावर, आमचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांवर किंवा सहकाऱ्यावर हल्ला करण्याबाबत विचारही केला असेल तर त्यांनाच भीती वाटली पाहिजे कारण याचा जो परिणाम होईल, त्याबाबत त्याने कधी विचारही केला नसेल.
बातम्या आणखी आहेत...