नवी दिल्ली - चीन आणि भारत दरम्यान असलेल्या सीमावादाने दोन्ही देश दीर्घ काळापासून त्रस्त आहेत. पण अद्याप सीमेची स्पष्ट आखणी करण्यात आलेली नही. त्यामुळे सीमेवर काही घटना घडण्याची शक्यता असते. लवकरच हा प्रश्न सोडवण्याच्या दिशेने प्रयत्न केले जाणार असल्याचे, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शिखर चर्चेनंतर बोलताना स्पष्ट केले.
भारत दौर्यावर असेलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना गुरुवारी दिल्लीत गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान शिखर वार्ता झाली. यात रेल्वेचे आधुनिकीकरण, चित्रपटांच्या निर्मीतीसह जवळपास 20 व्यावसायिक करार होणार आहेत.
शिखर बैठकीत भारत आणि चिन मैत्री संबंध वेगळ्या उंचीवर नेण्याची चर्चा केली जात आहे. मात्र, खर्या अर्थाने चीनचे धोरण भारतासोबत शत्रू सारखे आहे. जिनपिंग भारत दौर्यावर येण्याआधी चीनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. तर, त्यांच्या सरकारी वेबसाइटवर भारताच्या पंतप्रधानांबद्दल प्रतिकूल टिप्पणी केली गेली आहे.
नरेंद्र मोदींना त्यांनी 'कट्टर हिंदूत्ववादी' म्हटले आहे.
चिनच्या वेबसाइटवर काय म्हटले गेले
चीनच्या सरकारी वेबसाइटवर प्रकाशित एका लेखात भारताचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कट्टर हिंदूत्ववादी म्हटले आहे. पाकिस्तानी पत्रकार सज्जाद मलिक यांनी हा लेख लिहिला आहे. त्यात म्हटले आहे, की जर मोदींना चीनसोबतचे संबंध अधिक दृढ करायचे असतील तर त्यांना त्यांच्या कट्टतावादी सहकार्यांना नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. China.org.cn या वेबसाइटवर प्रकाशित या लेखाबद्दल वेबसाइटचे म्हणणे आहे, की हा लेख ओपिनियन कॉलममध्ये प्रकाशित झाला आहे, त्यामुळे त्या लेखात व्यक्त झालेल्या मतांशी आम्ही सहमत असूच असे काही नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत दौर्यावर निघणार त्याच दिवशी चीनी सरकारच्या नियंत्रणाखालील या वेबसाइटने हा लेख प्रकाशित केला आहे, हे विशेष. मलिक यांनी लेखात म्हटले आहे, की जिनपिंग यांच्या दौर्या दरम्यान मोदींना त्यांच्या दुहेरी व्यक्तिमत्वाचे उत्तर शोधण्याचे आव्हान असणार आहे. एकीकडे ते कट्टरपंथी समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात तर, त्याच वेळी जगासमोर भारताचे नेते म्हणून पुढे येतात. या लेखात 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलींचाही उल्लेख आहे.
जिनपिंग यांचे दिल्लीत स्वागत
तीन दिवसांच्या भारत दौर्यावर आलेल्या जिनपिंग यांचे अहमदाबादमध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत झाल्यानंतर दि्ल्लीत त्यांना राजकीय सन्मान देण्यात आला. राष्ट्रपती भवनात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी त्यांनी भारत आणि चीनच्या मैत्रीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा उल्लेख केला. जिनपिंग यांनी हा उल्लेख अशा वेळेस केला आहे, जेव्हा दोन्ही देशांदरम्यान सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.
तीन मुद्यांवर राहाणार लक्ष्य
गार्ड ऑफ ऑनर नंतर जिनपिंग म्हणाले, 'राष्ट्राध्यक्ष म्हणून माझा हा पहिलाच भारत दौरा आहे. या दौर्यात माझे तीन मुद्यांवर लक्ष्य राहाणार आहे. पहिला मुद्या हा
आपल्याला ही मैत्री वृद्धींगत करायची आहे. दुसरा हा, की एकमेकांची सभ्यता आणि संस्कृती यांचा सन्मान करायचा आहे आणि तिसरा व सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, विकास हे आपले दोन्ही राष्ट्रांचे एक समान लक्ष्य आहे. भारत आणि चीन एकत्र येऊन जगासाठी नव्या संधी निर्माण करु शकतात. आपल्याला आपले राजकीय सहकार्य नव्य उंचीवर घेऊन जाण्याची गरज आहे.' यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मोदी व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासह अनेक महत्त्वाचे लोक उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये छायाचित्रातून पाहा, जिनपिंग यांचे दिल्लीतील स्वागत....