नवी दिल्ली- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तीन दिवसांचा भारत दौरा आटोपून शुक्रवारी स्वदेशी रवाना झाला. भारत दौरा यशस्वी झाल्याचेही जिनपिंग यांनी सांगितले. जिनपिंग यांनी स्वदेशी रवाना होण्यापूवी कॉंग्रेसचे अध्यक्ष
सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. तसेच जिनपिंग यांनी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेतली.
डॉ.कोटणीस यांच्या कुटूंबियांना भेटून जिनपिंग यांनी परंपरा ठेवली कायम...
जिनपिंग शुक्रवारी सकाळी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान जेव्हाही भारताच्या दौर्यावर येतात तेव्हा डॉ. कोटनिस यांच्या कुटूंबियांची आवर्जुन भेट घेतात. गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा चीनने सुरु ठेवली आहे. डॉ.कोटणीस यांनी चीन-जपान युद्धात (1937-1945) मोलाचे योगदान दिले होते. युद्धदरम्यान वैद्यकीय सेवेसाठी चीनने केलेल्या आवाहनानंतर भारताने पाच डॉक्टरांचे पथक चीनमध्ये पाठवले होते. त्यात डॉ. कोटणीस यांचा समावेश होता.
चुमार येथून मागे हटले चीनी जवान...
सीमा प्रश्नावर
नरेंद्र मोदी आणि शी जिंगपिंग यांच्यात गुरुवारी चर्चा झाली. नंतर लडाखमधील चुमारमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या चीनी जवानांनी मागे हटले आहे. परंतु चीनी जवान एलएसीपासून पूर्णपणे मागे गेले की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. डेमचोकमधील परिस्थिती मात्र कायम आहे. डेमचोकमध्ये चीनी नागरिक मागील एक आठवड्यापासून आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौर्याची छायाचित्रे...