आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese President Xi Jinping To Visit Ahmedabad On 17th September, Preparations Are In Full Swing

चीनी राष्ट्राध्यक्षांसाठी मोदी देणार प्रोटोकॉलला फाटा, बाजरीची भाकरी-मसाले भाताचा पाहूणचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्याच दिवशी चीनचे राष्ट्राध्यक्ष पती शी जिनपिंग अहमदाबादला येणार आहेत. त्यांचे भारतीय परंपरेनुसार जंगी स्वागत करण्याची तयारी सुरु झाली आहे. पंतप्रधान मोदी प्रोटोकॉलला फाटा देत त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद विमानतळावर हजर राहाणार आहेत. जिनपिंग यांच्या पाहूणचारात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी त्यांच्या निवासव्यवस्थेपासून लंच, डिनर कार्यक्रम स्वतः मोदींच्या देखरेखीत ठरविण्यात आला आहे. चीनी राष्ट्राध्यक्षांना यावेळी बाजरीची भाकरी आणि मसाला भातसह 100 हून अधिक पक्वान्नांची मेजवाणी असणार आहे. त्यांच्या दौर्‍यानिमीत्त शहराच्या स्वच्छतेवरही विशेष लक्ष्य देण्यात आले आहे. राज्याच्या अनेक मंत्र्यांवर जिनपिंग यांना दौर्‍यात काही कमी पडणार नाही, याची जबाबदारी देण्यात आली आहे.
चीनी राष्ट्राध्यक्षांचा कार्यक्रम
अहमदाबाद विमानतळावरुन जिनपिंग वस्त्रपूर येथील ह्यात हॉटेलमध्ये जातील. तिथे अहमदाबाद महानगर पालिका आणि चीनच्या ग्वांगदोंग प्रांताच्या सरकारबरोबर परस्पर सहकार्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी होईल. त्यावेळी मोदी आणि जिनपिंग तिथे उपस्थित असतील. लंचमध्ये जिनपिंग यांना ह्यात हॉटेलमध्ये गुजराती थाळी देण्यात येईल. त्यानंतर मोदी त्यांना त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साबरमती रिव्हर फ्रंटच्या दौर्‍यावर घेऊन जातील. चिनचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबाद शहरात येत असल्याने शहराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष्य देण्यात आले आहे. कुठेही कचरा आणि कचरा कुंड्या दिसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मोदी आणि जिनपिंग महात्मा गांधीच्या साबरमती आश्रमालाही भेट देतील.
गुजराती व्यंजनांची असेल रेलचेल
जिनपिंग आणि मोदी साबरमती रिव्हर फ्रंट येथे डिनर करणार आहेत. यावेळी एकही चायनीज नॉन-व्हेज पदार्थ असणार नाही. चीनी राष्ट्राध्यक्षांना खास गुजराती पदार्थ वाढले जाणार आहेत. यावेळी 100 हून अधिक गुजराती पदार्थ असणार आहेत. त्यामध्ये विशेषतः बाजरीची भाकरी आणि मसाला भात असेल. याशिवाय सुप पासून डेझर्टपर्यंत सर्वकाही असणार आहे. जवळपास 250 पाहुण्यांसाठी गुजराती आणि काठेवाडी व्यंजनाची मेजवाणी असणार आहे.
डिनरमध्ये असतील हे पदार्थ
- आमरस, पुरण पोळी, श्रीखंड, मठ्ठा, ड्रायफ्रूट हलवा, रस मलाई.
- भाकरी, बिस्किट, रोटला, वघारेलो रोटला, हांडवा, ढोकळा, पात्रा, लिलवानी कचोरी.
- वांग्याचे भरीत, लसून-बटाटा भाजी, शेव-टॉमॅटो भाजी, थेपला, कैरीचे लोणचे.
- दाळ-भात, कढी, मसाला खिचडी, पुलाव.
- 10 पेक्षा जास्त प्रकारचे आयस्क्रिम, पहाडी खिर, लस्सी, मसाला छांस आणि फ्रेश फ्रूट ज्यूस.
अशी आहे तयारी
- VVIP पाहुण्यांसाठी वॉटर आणि फायर प्रूफ टेंच तयार करण्यात आले आहेत.
- गुजरात सरकारचे तीन प्रमुख मंत्री - नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चूडास्मा आणि सौरभ पटेल हे जिनपिंग यांना प्रत्येक ठिकाणी काय हवे-नको याची दक्षता घेतील.
- डिनरी जबाबदारी हॉटेल ताज उमेदला देण्यात आली आहे.
- रिव्हर फ्रंटवर मोदी आणि जिनपिंग जवळपास एक किलोमीटर पर्यंत फेरफटका मारतील आणि यावेळी त्यांच्यात चालता-चालता चर्चाही होईल.

(छायाचित्र - पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची यावर्षी जुलैमध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या ब्रिक्स संमेलनात भेट झाली होती.)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अहमदाबादमध्ये जिनपिंग यांच्या दौर्‍याच्याआधीची तयारी