आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Troops Intrude 500 Metres In Indian Territory In Ladakh And Put Up Tents

चीनी राष्ट्राध्यक्षांच्या दौर्‍याआधी पीएलए सैनिकांची भारतात घुसखोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 17 सप्टेंबर रोजी भारत दौर्‍यावर येणार आहेत. त्याआधी चीनी सैनिकांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनी सेना नियंत्रण रेषेपासून (एलओसी) 500 मीटर भारतात घुसली आणि तंबू ठोकले होते. गेल्या महिन्यात पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)चे सैनिक भारतीय हद्दीत 25 किलोमीटर आत घुसले होते.
11 सप्टेंबर रोजी झाली घुसखोरी
सूत्रांच्या माहितीनुसार, घुसखोरीची ही घटना 11 सप्टेंबर रोजी लडाखच्या देमचोक भागात घडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसचे (आयटीबीपी) 70 जवान या भागात तैनात करण्यात आले आहेत. 2014 मध्ये आतापर्यंत चीने 334 वेळा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे.

याआधी चीनी सैनिकांनी ऑगस्टमध्ये लडाखच्या बुर्तसे भागात 25 किलोमीटर आता घुसखोरी केल्याचे वृत्त होते. भारतीय लष्कराच्या गस्ती पथकाने पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) अधिकार्‍यांचे बेस कँप भारतीय हद्दीत 25 ते 30 किलोमीटर आत असल्याचे पाहिले होते. त्यानंतर गस्तीपथक परत फिरले होते. दुसर्‍या दिवशी गस्त घालण्यात आली तेव्हा त्यात कोणताही बदल झालेला नव्हता. तेव्हा भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना परत जा असे सांगणारा फलक हातात घेतला होता. भारतीय गस्ती पथकासोबत क्विक रिअॅक्शन टीम देखील गेली होती मात्र, चीनी सैनिकांनी जागा सोडण्यास नकार दिला होता.

(छायाचित्र - गेल्या वर्षी लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात चीनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. )