आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-चीनच्या लष्करांत धुमश्चक्री, अखेर विश्वासघाती चीनींनी घेतली माघार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय सीमेवर चीनकडून वेळोवेळी घुसखोरी केली जाते. चीनी लष्कराच्या जवानांनी 19 आणि 20 डिसेंबर रोजी लडाखमधील डेप्सांग आणि चुमार सेक्टरमध्ये घुसखोरी केली होती. त्यावर भारतीय लष्कराने आक्षेप घेतल्यावरही चीनी लष्कराचे जवान माघार घेण्यास तयार नव्हते. अखेर दोन्ही लष्कराच्या जवानांमध्ये जोरदार चकमक उडाली. यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी चीनी जवानांना माघार घेण्यास भाग पाडले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी राकी नाल्याजवळ पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांना भारत तिबेट सीमा पोलिसांनी (आयटीबीपी) बघितले. यावेळी "आयटीबीपी"च्या जवानांनी चीनी जवानांना माघार घेण्यास सांगितले. परंतु, चीनी माघार घेण्यास तयार नव्हते. अखेर दोन्ही लष्कराच्या जवानांनी एकमेकांवर तुफान गोळीबार केला. सुमारे अर्धा तास ही चकमक सुरू होती. अखेर चीनी लष्कराच्या जवानांनी माघार घेतली. त्यानंतर भारतीय जवानांनी बॅनर दाखवून घुसखोरी झाल्याची तक्रार केली.
या भागातील तापमान उणे 25 डिग्री असतानाही भारतीय जवानांनी चीनी जवानांचा रात्रभर पाठलाग केल्याचे समजते. वाई नाल्याजवळ असलेल्या चीनी चौकीतून चीनी जवान भारतीय भूमीवर आले होते. दोन्ही लष्कराच्या जवानांमध्ये झालेली चकमक आणि चीनी जवानांनी घेतलेल्या माघारीची माहिती संरक्षण मंत्रालयाला देण्यात आली आहे.
घोड्यांवर बसून आले होते चीनी जवान, वाचा पुढील स्लाईडवर...