आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लडाखमध्ये पुन्हा 35 चीनी सैनिकांची घुसखोरी, सीमेवर 1000 सैनिक समोरासमोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमोर चीनकडून होत असलेल्या घुसखोरीचा मुद्या जोरकसपणे मांडल्यानंतरही पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांची भारतीय हद्दीत घुसखोरी सुरुच आहे. पीएलएच्या जवानांनी लडाखच्या चुमार भागात तळ ठोकला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, चीनी सैनिकांनी पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. त्यांनी एका छोट्या डोंगरावर ताबा मिळविला आहे. चीनी सैनिकांची संख्या 35 असल्याचे सांगितले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी मोदींनी शी जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीत घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला होता.
चीनची पुन्हा घुसखोरी
संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले, की चुमारच्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. पीएलएचे जवळपास 300 सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दिसले होते. त्यातील बहुतेक गाड्यांमध्ये होते, तर काही उभे होते. याआधी शुक्रवारी डायरेक्टर जनरल (मिलिटरी ऑपरेशन) यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डाभोल यांना सांगितले, की चीनी सैनिक अजूनही भारतीय हद्दीत आहेत. ते मागे फिरलेले नाही तर त्यांनी तुकड्यांची अदलाबदल केली आहे.
भारतीय लष्कर सज्ज
चुमारमध्ये चीनी सैनिकांच्या उपस्थितीनंतर भारतीय लष्करानेही सज्जता दाखविली आहे. पीएलएचे जवान परतल्यानंतर भारतीय लष्कराने संभाव्य धोका ओळखून त्या भागात तंबू ठोकले आहेत.
सध्या तणावपूर्ण स्थिती
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंचे जवळपास 1000 हजार जवान एकमेकांसमोर आहे. चीनी सैनिकांनी भारतीय हद्दीतील पाच-सहा ठिकाण्यांवर ताबा मिळविला आहे.