आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Troops Training Pak Army Near India Pakistan Border

बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिकांना प्रशिक्षण देत आहेत चीनी सैनिक, BSF चा खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनचे सैनिक पाकिस्तानी लष्कराला जम्मू-काश्मीर सीमेजवल प्रशिक्षण देत आहेत. भारतीय संरक्षण संस्थांनी ही माहिती एका अहवालात दिली आहे. हा अहवाल बीएसएफच्या एका गुप्तचरसंस्थेने तयार केला आहे.
अहवालानुसार, चीनचे सैनिक पाकिस्तानच्या सैनिकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. हे प्रशिक्षण राजौरी सेक्टरजवळ आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरु आहे. बीएसएफच्या अहवालानुसार, श्रीगंगानगर सेक्टरजवळ पाकिस्तानी रेंजर्स ऐवजी त्यांचे सैनिक तैनात करण्यात आले आहे. तसेच पंजाबच्या अबोहर आणि गुरदासपुर सेक्टर पलिकडे पाकिस्तानने अनेक चौक्या तयार केल्या आहेत.
स्नायपर तैनात करण्याची पाकची योजना
बीएसएफच्या अहवालानुसार, सीमेवर रेकॉर्ड झालेल्या बातचीतवर संकेत मिळत आहेत, की पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्स भारतीय सैनिक आणि साधन सामुग्री व संपत्तीला निशाणा बनवण्याची योजना आखत आहेत. त्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ठिकाण्यांवर स्नायपर तैनात करत आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा आणि लाइन ऑफ कंट्रोल जवळ पाकिस्तानच्या लष्करातील विशेष कमांडोंचे पथक देखील तैनात केले गेले आहे. हे पथक भारतीय हद्दीत हल्ला देखील करु शकते, असे बीएसएफच्या अहवालात म्हटले आहे.
निवडणूक उधळून लावण्याची शक्यता
गुप्तचर संस्थेचा दावा आहे, की पाकिस्तानच्या सियालकोट भागात दहशतवाद्यांच्या एका मोठ्या गटाचा सुगावा लागला आहे. येत्या काळात जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या दरम्यान हा गट घुसखोरी करण्याची शक्यता आहे.