आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशिकला हाेणार तमिळनाडूच्या नव्या \'अम्मा\'; मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचा राजीनामा स्विकारला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी कोण, या प्रश्नाबद्दल जो अंदाज बांधला जात होता त्यावर रविवारी शिक्कामाेर्तब झाले. अण्णाद्रमुकच्या महासचिव शशिकला (६१) आता तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होतील. दरम्यान, मुख्यमंत्री पनीरसेल्व्हम यांनी रविवारी राजीनामा दिला.

दुसरीकडे, तामिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्र‍िपदाचा राजीनामा स्विकारला, पुढील व्यवस्था होईपर्यंत पद सांभाळण्यास सांगितले आहे.


२०१६ मध्ये अण्णाद्रमुक सत्तेत आल्यापासून ९ महिन्यांच्या काळात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या शशिकला तिसऱ्या नेत्या आहेत. दरम्यान, जयललितांची भाची दीपा यांनी हे प्रकार एका अर्थाने बंडच असल्याचे सांगून जयललिता यांच्या जन्मदिनी २४ फेब्रुवारीला आपले धोरण जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे.
 
३७ वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण
१९८० मध्ये शशिकला जयललितांच्या विश्वासू बनल्या. मात्र, त्यांना अण्णाद्रमुकचे सर्वेसर्वा व्हायचे होते. त्यामुळे अनेकदा त्यांचा जयललिता यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांशी वाद झाला. अखेर स्वप्न पूर्ण झालेच. 
 
सुप्रीम कोर्टाच्या निकालास महत्त्व
- शशिकलांविरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरणे सुरू आहेत. याचा निकाल लागला तर अडचण होईल.
- मोदी सरकार राज्यसभा व राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शशिकलांना मदत करेल.
- दीपा नव्या पक्षाची २४ तारखेला घोषणा करू शकतील. 
 
अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री पनिरसेल्वम यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. AIADMKच्या रविवारी झालेल्या बैठकीत विधिमंडळाच्या नेतेपदी शशिकला यांनी बहुमताने निवड करण्यात आली. आज जयललिता यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्र‍िपदाचा राजीनामा दिला आहे. पन्नीरसेल्वम यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदासाठी शशिकला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. प्रस्तावाला बैठकीत उपस्थित आमदारांनी बहुमताने मंजुरी दिली.

हेही वाचा....शशिकला यांनी जयललितांवर केला होता विषप्रयोग, मोदींनी अम्मांना केले होते सावध

AIADMK ने केले ट्वीट...
- . "चिन्नम्मा (शशिकला) आता तमिळनाडुच्या नव्या मुख्यमंत्री होतील," असे AIADMKच्या वतीने ट्वीट करण्यात आले आहे
- "AIADMK कायम अम्मा (जयललिता) आणि चिनम्मा यांच्या आदेशाचे पालन करेल."
- तमिळनाडु सरकार नेहमी गरीब आणि गरजूंच्या हितासाठी काम करेल, असा विश्वास शशिकला यांनी यावेळी व्यक्त केला. 
- जयललिता यांच्या मृत्यूनंतर शशिकला यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवण्यात आली होती. जयललिता यांच्या निधनापासून शशिकला यांनी राज्याची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी पक्षातील एका गटाकडून सातत्याने केली होती. त्याचप्रमाणे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी इच्छा पक्षाच्या आमदारांनी व्यक्त केली होती. 

दुसरीकडे माजी मंत्री के. ए. सेनगोट्टियान, एस. गोकुल इंदिरा व बी. व्ही. रामना यांच्यावर पक्षाच्या सचिवपदांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युवक आघाडीच्या सचिवाची उचलबांगडी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चार मंत्र्यांनी शशिकला यांना मुख्यमंत्री करण्याची सूचना केली होती. शशिकला (62) या जयललिता यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. तीन दशकांपासून त्या अण्णाद्रमुकमध्ये सक्रिय आहेत. त्यांना विरोध करणारा गटही पक्षात सक्रिय आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

‘दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे’: पक्षाचे लोकसभेतील उप सभापती एम. थंबीदुराई यांच्यासह अनेक नेत्यांची इच्छा पक्षाध्यक्ष व मुख्यमंत्रिपदी एकच व्यक्ती असावी, अशी आहे. शशिकला यांना पक्षातून चांगला पाठिंबा मिळू लागला आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, निवडणूक आयोगाने अण्णाद्रमुकला पाठवली नोटीस
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...