आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chit Fund Scam CBI Rade In India News In Divyamarathi

चिट फंड घोटाळा, सीबीआयच्या धाडी, सी शोर समूहाचा एक हजार ५०० कोटींचा अपहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय चिट फंड योजनांचा तपास करत आहे. याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी चार शहरांतील २२ ठिकाणांवर छापे टाकले. यात आेडिशाचे राज्यसभा सदस्य प्यारीमोहन महापात्र यांच्या घराचाही समावेश आहे.

ही कारवाई सी शोर चिटफंड घोटाळा प्रकरणी करण्यात आली. भुवनेश्वर येथे १६, कटकमध्ये ४, बोलांगीर जिल्ह्यातील टिटलागड सुंदरगडच्या राऊरकेला येथील एका ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या. शिवाय महापात्र, दोन सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, उद्योगपतींची घरे यातील मध्यस्तांची कार्यालये यावरही सीबीआयने धाडी टाकल्या. सी शोर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. दास त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या घरांचीही सीबीआयने झडती घेतली.
या सगळ्यांवर सी शोर समूहाशी संबंध पैशाच्या अपहाराचा आरोप आहे, तर सी शोर समूहावर हजार ५०० कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. आपण सीबीआयला संपूर्ण सहकार्य करत असल्याचे राज्यसभा सदस्य प्यारीमोहन महापात्र यांनी भुवनेश्वर येथे सांगितले. कोणत्याही चिट फंड कंपनीशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
सी शोर समूहाचे अटकेत असलेले संचालक प्रशांत दास यांना आपल्या घरी काही कार्यक्रमानिमित्त भेटल्याचे महापात्र म्हणाले.

पटनायक सरकार अडचणीत येणार?
सीबीआयच्यातपासामुळे ओडिशाच्या नवीन पटनायक सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने सार्वजनिक खासगी संयुक्त प्रकल्पांची कंत्राटे सी शोर समूहाला दिलेली आहेत. याप्रकरणी सीबीआय आेडिशाच्या अनेक बड्या नेत्यांची चौकशी करत आहे.
शारदा घोटाळ्याचे दुसरे आरोपपत्र दाखल : सर्वोच्चन्यायालयाने मे रोजी सीबीआयला शारदा चिट फंड इतर चिट फंड योजनांचा तपास करण्याचे आदेश दिले होते. यात आेडिशाच्या सी शोर अर्थतत्त्वसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. सीबीआयने सोमवारी शारदा समूहाविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे.