आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chocolate Industry Increases Day By Day In India

चॉकलेट उद्योगाचे 'कुछ मीठा हो जाए'; भारतात दिवसेंदिवस विस्तारतोय बाजार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वाढती समृद्धी व वेगाने विस्तारत असलेल्या मध्यमवर्गामुळे दिवसागणिक विस्तारणारा देशातील चॉकेलट बाजार 'कुछ मीठा हो जाए' असे म्हणत व्यवसाय वृद्धीचे सेलिब्रेशन करत आहे. देशात गेल्या काही दिवसांत चॉकलेट्सची मागणी आणि विक्री वाढत आहे. देशात मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असून त्या वर्गात चॉकलेटची लोकप्रियता आणि मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे देश-विदेशातील चॉकलेट उत्पादक कंपन्यांसाठी व्यवसाय विस्ताराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारी बाजारपेठ म्हणून भारतावर लक्ष केंद्रित करत असून नवनवीन स्वाद व चव असणारी चॉकलेट उत्पादने भारतीय बाजारात उतरवत आहेत.

मार्केट रिसर्च संस्था मिंटेल ग्रुपच्या ताज्या अहवालानुसार भारतात मिठाई त्याखालोखाल चॉकलेट्सची मागणी, विक्री वाढताना दिसत आहे. विशेषत: वाढदिवसाला चॉकलेटची उपस्थिती अनिवार्य ठरताना दिसत आहे. देशात प्रतिव्यक्ती चॉकलेटचा खप 2007 मध्ये 40 ग्रॅम इतका होता. तो 2011 मध्ये 73 ग्रॅमवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार योग्य प्रकारे प्रयत्न केले तर देशात चॉकलेटची बाजारपेठ आणि मागणी आणखी वाढू शकते.