आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chopper Scam: CBI Gets Phone Transcripts From Italy

हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या तपासात सीबीआयला मोठे यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या तपासात सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. इटलीचा एक दलाल आणि संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांदरम्यान फोनवर झालेल्या संभाषणाची ट्रान्स्क्रिप्ट सीबीआयला मिळाली आहे. या कंपनीत इटली सरकारची 30 टक्के मालकी आहे. सूत्रांनुसार, इटलीने हे संभाषण संरक्षण मंत्रालयाकडे सोपवले होते. ते आता सीबीआयच्या ताब्यात आले आहे. हे संभाषण इटालियन भाषेत असून सीबीआय त्याचा अनुवाद करून घेत आहे. या व्यवहारातील कथित दलाल हश्के आणि गॅरोसा कालरे यांच्यात झालेल्या संभाषणाचे विवरणही त्यात आहे. इटलीच्या अधिकार्‍यांनीच हे संभाषण टॅप केले होते. या संभाषणात एखाद्या भारतीय दलालाचे नाव आले आहे किंवा नाही हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

संरक्षण मंत्रालयाकडे दस्तऐवज कशामुळे
इटलीतील नियमानुसार कोणत्याही प्रकरणात चौकशीदरम्यान संबंधित दोन्ही पक्षांना माहितीसाठी दस्तऐवज सोपवले जातात. इटलीतील अधिकार्‍यांनी आरोप केले होते की व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार व्हावा म्हणून कंपनीने लाच दिली होती. त्यानंतरच ऑगस्टा वेस्टलँडच्या वतीने 12 हेलिकॉप्टर पुरवण्याच्या व्यवहाराला अंतिम रूप मिळाले.

एकूण 13 आरोपी
सीबीआयने या प्रकरणात 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून यात माजी हवाईदलप्रमुख एस. पी. त्यागी, युरोपचा दलाल गॅरोसा, ख्रिश्चियन मायकल व हश्के यांचा समावेश आहे.