आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chota Shakeel Dares Modi Government To Catch Daud Ibrahim

शकीलने उडवली मोदी सरकारची खिल्ली, म्हणाला- दाऊदला पकडणे हलवा आहे का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याच्या वक्तव्यांची डॉनचा उजवा हात छोटा शकीलने खिल्ली उडवली आहे. एका इंग्रजी दैनिकासोबत फोनवर झालेल्या संभाषणात तो म्हणाला, 'भारतात नवे सरकार सत्तेवर आले की त्यांच्या वल्गना सुरु होता. त्यांचे पहिले लक्ष्य आम्हीच असतो. त्याला भारतात घेऊन येऊ, तिथे घुसून आणू. अरे, काय हलवा आहे का? बकरीचं पिल्लू समजले का? आणायचेच आहे तर त्याला आणा ना !' 'त्याला' म्हणजे छोटा शकीलचा रोख गँगस्टर छोटा राजनकडे होता. शकीलने त्याचा शत्रू छोटा राजनचा ऑस्ट्रेलियात 'गेम' करण्याच्या वृत्तावर म्हटले, 'आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलोच होतो. पण तो उंदिरासारखा पळून गेला.' देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, की दाऊदला देशात आणण्याच्या ऑपरेशनची प्रेस रिलीज काढली जात नाही. अमेरिकने पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला संपवण्याची कारवाई काय माध्यमांमध्ये जाहीर करुन केली होती ?
दाऊदच्या हत्येच्या प्रयत्नावरील वृत्तावर भडकला शकील
गेल्या वर्षी 16 डिसेंबरला शकीलची मुलगी झोयाच्या लग्नाला आलेल्या दाऊदच्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या बातमीबद्दल विचारले असता, शकील भडकला. तो म्हणाला, 'असेच प्रश्न विचारा ज्याचे उत्तर मी देऊ शकेल. आजपर्यंत जेव्हा-जेव्हा अशी माहिती पुढे आली आहे, तो यंत्रणांचा 'ख्याली पुलाव' होता. ते स्वप्नच पाहात, त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.'
राजनच्या 'हिंदू डॉन' उल्लेखाने शकील नाराज
भारतीय सुरक्षा यंत्रणा गुन्हेगारी गँगमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप शकीलने केला. तो म्हणाला, अशाही बातम्या येत आहेत, की भारत छोटा शकीलला भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. जर सुरक्षा यंत्रणांना माहित होते, की मी त्याच्याविरोधात षड्यंत्र रचत आहे आणि तो कुठे आहे, हेही त्यांना माहित होते तर त्याला पकडले का नाही? त्याने गुन्हे केले नाहीत का ? तो गुन्हेगार नाही का ? राजनची 'हिंदू डॉन' अशी छबी निर्माण करण्यावरही तो भडकला. शकील म्हणाला, 'हे मीडियाचे काम. पॅट्रियॉट (देशभक्त) तर लष्करात भरती करुन घ्या... बॉर्डरवर पाठवा.. देशाच्या कामी येईल. हिंदू डॉन ही संकल्पना तुम्हा लोकांचीच आहे. मीडियाच्याच डोक्यातून ते आले आहे. त्याने पैसे घेऊन हिंदूना देखील मारले आहे.'

डॉनला भारतात येण्याची इच्छा नाही
दाऊद आणि छोटा शकील यांना आता भारतात परतण्याची इच्छा नाही. शकीलने सांगितल्यानूसार, 1993 च्या बॉम्ब स्फोटानंतर दोघांनाही भारतात परत यायचे होते. पण भारत सरकारने त्यांचा प्रस्ताव नाकारला. शकील म्हणाला, 'जेव्हा 1993 मध्ये आम्हाला देशात परत यायचे होते, तेव्हा तुम्ही लोकांनी आणि तुमच्या सरकारने त्याला मंजूरी दिली नाही. भाईने राम जेठमलानींसोबत लंडनमध्ये बोलणी केली होती. सर्व काही ठरले होते. मात्र तेव्हा मंत्रालय आणि अडवाणीने गेम केला.' वास्तविक अडवाणींने काय केले याबद्दल शकीलन काही सांगितले नाही.