आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादसह देशभरातून IS चे 30 सपोर्टर अटकेत, NIAची मोठी कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयएसचा प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
आयएसचा प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या आधी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एक मोठे षडयंत्र उद्धवस्त केले आहे. एनआयएने '7 कलश रख दो' हा मॅसेज डिकोड केला. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार या मॅसेजचा अर्थ 7 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणा असा होता. दुसरीकडे गुरुवार रात्रीपासून आतापर्यंत देशाच्या विविध शहरांतून 30 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचा उद्देश विदेशी नागरिक आणि पोलिसांना लक्ष्य करण्याचा होता.

सुरक्षा यंत्रणांनी कशी केली कारवाई
- मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी पश्चिम आशियातील आयएसचे फोन आणि कॉम्प्यूटर्स ट्रॅक केले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय तपास यंत्रणांना याची माहिती दिली. या लिडच्या आधारे यंत्रणांनी कारवाई केली आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए अनेक दिवसांपासून आयएसचे कॉम्प्यूटर्स आणि स्मार्ट फोनच्या आयपी अॅड्रेसवर नजर ठेवून होते.
- दहशतवादी या आयपी अॅड्रेसचा वापर फेसबुक ओपन करण्यासाठी करत होते.
- शनिवारी सकाळी महाराष्ट्रातील औरंगाबादमधून एका संशयिताला अटक करण्यात आली. हे एनआयएचे मोठे यश मानले जात आहे. (सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
- यातील एका आयपी अॅड्रेसचा वापर आयएस कमांडर शफी अरमार करत होता. शफीचे सांकेतिक नाव युसूफ अल हिंदी होते.
- शफी भारतात हरिद्वारहून ताब्यात घेण्यात आलेल्या अखलाक उर रहमान सारख्या अनेकांच्या संपर्कात होता.
- सुरक्षा यंत्रणांचे सर्वात मोठे यश हे मानले जात आहे, की त्यांनी यांच्या दरम्यान होत असलेल्या व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवरील मॅसेजही मिळवले आहेत.

'7 कलश रख दो' मॅसेजने झाला खुलासा
- या महिन्यात अखलाक आणि युसूफ यांच्यात '7 कलश रख दो' हा मॅसेज शेअर झाला होता.
- सूत्रांची माहिती आहे, की याचा अर्थ सात ठिकाणी ब्लास्ट करा. हा मॅसेज अमेरिकन गुप्तचर संस्थांनी भारतीय सुरक्षा यंत्रणांना शेअर केला होता. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांना माहिती देण्यात आली.
- मॅसेज शेअर झाल्यानंतर भारतात सस्पेक्ट हरिद्वारहून रुडकीला शिफ्ट झाला.
- दरम्यान, देशातील अनेक भागात आयएसचे हस्तक सक्रिय झाले.

दिल्लीत कंट्रोल रुम
- ठोस पुरावे मिळाल्यानंतर एनआयए आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी या सर्व घडामोटींवर नजर ठेवली.
- दिल्लीत कंट्रोल रुम तयार करण्यात आली. रुडकी आणि हरिद्वार येथे करडी नजर ठेवली जात आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, आतापर्यंत किती जणांना झाली अटक