आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cic Asks Du Gujarat University To Make Public Edutional Details Of PM Modi

केजरीवालांना पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पदवीबाबत माहिती द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) दिल्ली व गुजरात विद्यापीठाला निर्देश जारी केले असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबतची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लवकर उपलब्ध करून द्यावेत असे म्हटले आहे.

मुख्य माहिती आयुक्त आचार्यलू यांनी म्हटले की मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या नागरिकास आपल्या पंतप्रधानांच्या पदवीबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक आहे.

केजरीवाल यांनी गुरुवारी माहिती आयोगास पत्र लिहून पंतप्रधानांच्या पदवीबाबतची माहिती जाहीर न केल्याबद्दल टीका केली होती. मोदींच्या पदवीची माहिती सार्वजनिक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर आचार्यलू यांनी म्हटले की, लोकांनी पंतप्रधानांच्या पदवीबाबत माहिती जाणून घेऊ इच्छितात. याचा अर्थ असा नव्हे की ती जनहिताची बाबत आहे. आपल्या देशाचा कोणताही कायदा लोकसभेची िनवडणूक लढवण्यासाठी िकंवा पंतप्रधान होण्यासाठी पदवी असलीच पाहिजे, असा अाग्रह धरत नाही. परंतु मुख्यमंत्रीपदावर बसलेला नागरिक आपल्या पंतप्रधानांबाबत माहिती जाणून घेऊ इच्छित असेल तर ही माहिती सार्वजनिक करून त्याला ती दिली गेली पाहिजे.

आचार्य लू यांनी पंतप्रधान कार्यालयालाही म्हटले की त्यांनी िवद्यापीठाला पंतप्रधानांचा रोल नंबर, डिग्री क्रमांकासह इतर आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी. दिल्ली विद्यापीठाने याबाबत म्हटले होते की, कोणत्याही विद्यार्थ्याचा रोल नंबर मिळाल्याशिवाय त्याचे रेकॉर्ड शोधणे कठीण आहे.

पंतप्रधान मोदी बीए, एम.ए
प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी १९७८ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या बहिस्थ अभ्यासक्रमाअंतर्गत राज्यशास्त्रातून बी.ए. केले आहे. त्यानंतर १९८३ मध्ये त्यांनी गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए. केले आहे.