आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीहत्येचा एफआयआर; आरोपपत्र समोर येणार, कागदपत्रे देण्याचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महात्मा गांधी यांच्या हत्येसंदर्भात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर आणि आरोपपत्र सार्वजनिक होणार आहे. केंद्रीय माहिती आयोगाने गृहमंत्रालयाला याबाबत निर्देश दिले आहेत.

ओडिशाच्या बोलांगीर जिल्ह्याचे रहिवासी हेमंत पांडा म्हणाले, गृह मंत्रालयाकडून सात मुद्द्यांच्या आधारे माहिती मागितली होती. यामध्ये एफआयआर आणि आरोपपत्रासोबत महात्मा गांधींचे शवविच्छेदन झाले होते काय, अशी माहितीही मागवण्यात आली. यावर मंत्रालयातर्फे हा अर्ज नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडिया, दर्शन समिती आणि गांधी स्मृती केंद्राकडे पाठवण्यात आला होता. यास याआधी बिर्ला हाउसही संबोधले जात होते. महात्मा गांधींनी अखेरचे दिवस बिर्ला हाउसमध्ये व्यतीत केले होते. तेथेच त्यांची हत्या झाली होती. पब्लिक रेकॉर्ड अॅक्ट १९९३ आणि पब्लिक रेकॉर्ड रुल्स १९९७ च्या तरतुदीअंतर्गत आवश्यक माहिती प्राप्त करण्यासाठी कार्यालयात येऊ शकता, असे नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडियाने पांडा यांना सांगितले. बापूंच्या नातेवाइकांच्या भावनेचा आदर करत शवविच्छेदन केले नव्हते, असे गांधी स्मृती आणि दर्शन समितीने त्यांना सांगितले. हत्येचा तपास तुघलक रोड पोलिस ठाण्याने केला होता, असे गांधी स्मृती केंद्राने स्पष्ट केले. माहिती आयुक्त शरद सबरवाल म्हणाले, अर्जदाराने गृह मंत्रालयाकडून माहिती मागवली होती. गृहमंत्रालयाच्या सीपीआयओंना आरोपपत्र आणि एफआयआर शोधण्याचे आदेश देत असल्याचे त्यांनी नमूद केले. दस्तऐवज तुघलक रोड पोलिस ठाण्यात आहेत की मंत्रालयात, हे मंत्रालयाकडून ३० दिवसांत लेखी कळवले जाईल.
बातम्या आणखी आहेत...