आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cic Issues Notice To Sonia, Amit Shah, Mayawati And 3 Other Party Chief

RTI लागू केला नाही म्हणून सोनिया गांधी, अमित शहांसह सहा पक्ष प्रमुखांना नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय माहिती आयोगाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यासह सहा राजकीय पक्षांच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयोगाने या नेत्यांना नोटीस पाठवून माहिती अधिकार अधिनियम कायद्या लागू करण्यासंबंधी दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून चौकशी का करु नये? असा सवाल केला आहे.
मागील वर्षी 3 जून 2013 रोजी आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांच्या याचिकेवर आयोगाने सहा राष्ट्रीय पक्षांना - काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी), भारतीय कम्यूनिस्ट पक्ष (सीपीआय), कम्यूनिस्ट पक्ष मार्क्सवादी (सीपीएम), आणि बहुजन समाज पक्ष (बसप) यांना पब्लिक अथॉरिटी घोषित केले होते. आणि त्यामुळे हे सर्व पक्ष माहिती अधिकार कायद्यांतर्गत येतात असे सांगितले होते. या निर्णयाला एकाही पक्षाने कोर्टात आव्हान दिले नव्हते आणि आयोगाच्या आदेशाचे पालन देखील केले नाही.
आधीही मागितला होता खुलासा
आयोगाने यावर्षी 7 फेब्रुवारी आणि 25 मार्च रोजी देखील या सर्व पक्षांना खुलासा मागितला होता. या नोटीस आरटीआय कार्यकर्ते अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर पाठविण्यात आल्या होत्या, हे विशेष. अग्रवाल यांनी कोर्टात तक्रार दाखल केली होती, की राजकीय पक्षांनी केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशांचे पालन केलेले नाही.

(छायाचित्र - भाजप अध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी . )