आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी हत्येची चार्जशीट आणि नथुराम गोडसेंचा जबाब सार्वजनिक करा- माहिती आयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 जानेवारी, 1948 रोजी नथुराम गोडे याने गोळ्या झाडून महात्मा गांधी यांची हत्या केली होती. - Divya Marathi
30 जानेवारी, 1948 रोजी नथुराम गोडे याने गोळ्या झाडून महात्मा गांधी यांची हत्या केली होती.
नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोंडसे आणि या खटल्याशी संबंधित दस्ताऐवज नॅशनल आर्काइव्हच्या वेबसाइटवर सार्वजनिक करण्याचे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) दिले आहेत.

नथुराम गोडसे आणि सहआरोपींनी मांडलेल्या बाजूबाबत असहमती असू शकते. पण खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांनी जो जबाब नोंदवला, तो गोपनीय ठेवता येणार नाही. ही माहिती पुढील 20 दिवासांच्या आत सार्वजनिक करावे, असे सीआयसीचे आयुक्त एम.श्रीधर आचार्युलू यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आशुतोष बन्सल यांनी याचिका दाखल करुन महात्मा गांधी हत्येशी संबंधित आरोपपत्रासह (चार्टशीट) नथुराम गोडसेच्या जबाबाची मागणी केली होती. त्यांच्या याचिकेला उत्तर देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, संबंधित माहिती राष्ट्रीय अभिलेखागाला पाठवण्यात आली असून ती तिथून घ्यावी. मात्र, आशुतोष बन्सल यांना माहिती न मिळाल्याने त्यांची थेट केंद्रीय माहिती आयोगात याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन केंद्रीय माहिती आयोगाने या संबंधित माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देश दिले आहेत. 

पुढील स्लाइडवर पाहा, महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे आणि सहआरोपींचे फोटोज... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...