आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CIC Says, Con't Disclosure Of All Govt Email IDs National Security Threat

सर्व सरकारी मेल आयडी जाहीर करणे धोक्याचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माहितीच्या अधिकाराखाली सर्व सरकारी अधिकाऱ्यांचे ई-मेल आयडी सार्वजनिक करता येत नाही. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे.

तथापि, आयोगाच्या पूर्णपीठाने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरला (एनआयसी) सांगितले आहे की, त्यांनी व्यापक जनहितार्थ जनतेशी निगडित अधिकाऱ्यांचे ई-मेल आयडीची वेब डिरेक्टरी बनवण्यात यावी. माहिती आयुक्तांत वसंत शेठ, यशोवर्धन आझाद आणि श्रीधर आचार्युलू यांच्या पीठाने सांगितले की, सर्व ई-मेल आयडींची यादी सीडीमध्ये देणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. अनेक महत्त्वाच्या सेवांना फटकाही बसू शकतो. सरकारी मंत्रालये व विभागांच्या वेबसाइट्स आणि ई-मेल्सना देशातील व बाहेरील समाजकंटक हानी पोहोचवू नयेत, याची सरकारने खबरदारी घ्यायला हवी. चुरू येथील मनिराम शर्मा यांनी एनआयसी संचालित सरकार, सर्व लोकसेवा अधिकारी आणि संघटनांचे ई-मेल आयडी मागितले होते. पीठाने त्यांची विनंती अमान्य केली.