आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CJI TS Thakur Says We Don\'t Go To Manali For Vacations

मोदींच्या सल्ल्यावर सरन्यायाधीश म्हणाले- मनालीला सुटी घालवायला जात नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - न्यायाधीशांवरील कामाच्या बोजाचा उल्लेख करताना एका कार्यक्रमात भावूक झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांनी मोदींच्या सल्ल्यावर टीप्पणी केली आहे. मोदींनी न्यायाधीशांना कोर्टाच्या सुट्या कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर सोमवारी जस्टीस ठाकूर म्हणाले, 'आम्ही मनालीला सुट्या घालवायला जात नाही.'


जस्टिस ठाकूर का झाले होते भावूक


रविवारी दिल्लीत न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत जस्टिस ठाकूर यांनी सांगितले, की देशातील न्यायालयांमध्ये का 3 कोटी खटले पडून आहेत, आणि कसे त्यांच्या निपटारा लावण्यासाठी फक्त 18000 जज आहेत.
- याचा उल्लेख करताना जस्टिस ठाकूर इमोशनल झाले होते.
- त्यानंतर बोलताना मोदी म्हणाले होते, की मी तुमचे दुःख समजू शकतो. त्यांनी न्यायालयाच्या सुट्या कमी करण्याचा सल्ला दिला होता.


काय म्हणाले जस्टिस ठाकूर


- वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, सोमवारी सरन्यायाधीशांना मोदींच्या सल्ल्याबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले, 'आम्ही मनालीला सुट्या घालवण्यासाठी जात नाही. घटनात्मक पीठ ऑर्डर लिहित बसलेले असते... जेव्हा एक पक्ष तयार असतो तेव्हा दुसरा हजर राहात नाही. बार असोसिएशनला एकदा विचारुन घ्या ते तयार (सुट्या कमी करण्यासाठी) आहेत का?'
परिषदेत काय झाले होते...
- न्यायाधीशांवरील कामाच्या बोजाचा उल्लेख करताना रविवारी देशाचे सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांचे डोळे पाणावले.
- दाटलेल्या कंठाने ते म्हणाले, 'तुम्ही संपूर्ण जबाबदारी न्यायपालिकेवर टाकू शकत नाही.' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही उपस्थिती होती.
- विधी आयोगाने 1987 च्या अहवालात म्हटले होते की, देशात दर 10 लाख लोकसंख्येमागे 10 न्यायाधीश असतील. खरे तर हा आकडा 50 असायला हवा. पण काहीच बदलले नाही.
- ‘गरीब’ लोक वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडतात. म्हणून न्यायव्यवस्थेवर टीका पुरेशी नाही. त्यावरील बोजा पाहिला पाहिजे. उपाय म्हणून न्यायाधीशांची रिक्त पदे भरली पाहिजेत. हे सांगताना सरन्यायाधीशांचा कंठ दाटला. डोळे पाणावले. त्यांनी रुमालाने अश्रू टिपले. संपूर्ण भाषणादरम्यान ते भावुकच दिसले.
- ते म्हणाले, 'लहानपणी गणितात एक प्रश्न विचारला जात होता. एक रस्ता तयार करण्यासाठी पाच जणांना 10 दिवस लागतात, जर तोच रस्ता एका दिवसांत तयार करायचा असेल तर किती लोक लागतील.'
- 'उत्तर असायचे 50. त्याच पद्धतीने 38,88,000 खटल्यांचा निपटारा लावण्यासाठी किती जज लागतील? ही बाब आम्हाला का कळत नाही?'
- 'अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात एक जज प्रत्येकवर्षी 81 प्रकरणांवर निर्णय देतात. त्याचवेळी भारतात एक जज सरासरी 2600 प्रकरणांची सुनावणी करतात.'
- 'एक जज 2600 खटले सुनावतो, इतक्या दबावानंतरही चांगले काम शक्य आहे का?'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सरन्यायाधीशांच्या भावूक भाषणाचा VIDEO
>> काय म्हणाले होते मोदी
>> सुप्रीम कोर्टात किती जागा रिक्त
>> कोणत्या हायकोर्टात जजची सर्वाधिक कमतरता