आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅराडाइज पेपर्स : अमिताभ, जयंत सिन्हांसह 714 भारतीयांची नावे; 1.34 कोटी दस्तऐवज लीक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पनामा पेपर्सच्या १८ महिन्यांनी ‘पॅराडाइज पेपर्स’ हा एक मोठा आर्थिक डेटा समोर आला आहे. यात जगभरातील श्रीमंतांचा पैसा परदेशी पाठवण्यात मदत करणाऱ्या फर्म व परदेशी कंपन्यांची माहिती आहे. १.३४ कोटी लीक कागदपत्रांत केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा, भाजपचे राज्यसभा खासदार आर.के. सिन्हा, अमिताभ बच्चन, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त (दिलनशीं नावाने) कॉर्पोरेट लाॅबिस्ट नीरा राडियांसह ७१४ भारतीयांची नावे आहेत. कुणाची गुंतवणूक अवैध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पनामा पेपर्सचा गाैप्यस्फोट करणाऱ्या जर्मनीच्या जीटॉयचे साइटुंग वृत्तपत्राने पॅराडाइज पेपर्सचा खुलासा केला. ९६ माध्यम समूहांच्या इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिव्ह जर्नलिस्ट्स संस्थेने (आयसीआयजे) या कागदपत्रांची तपासणी केली. त्याचे ४० अहवाल यायचे बाकी आहेत. 
 
असा झाला पर्दाफाश
बर्म्युडा देशाची लॉ फर्म एपलबी व सिंगापूरच्या एशियासिटीसह जगभरातील १९ टॅक्स हेवन देशांत प्रभावी आसामी व सेलिब्रिटीजच्या गुंतवणुकीचा १० महिन्यांपेक्षा जास्त काळ तपास करण्यात आला. १८० देशांच्या यादीत भारत १९ व्या स्थानी आहे. ही यादी www.icij.org वरही आहे. लीक कागदपत्रांत सर्वाधिक एपलबी कंपनीची आहेत. ११९ वर्षे जुनी एपलबी कंपनी वकील, अकाउंटंट्स, बँकर्स व इतर लोकांच्या नेटवर्कची एक सदस्य आहे. त्यात कर वाचवण्यासाठी परदेशात कंपन्या उघडणाऱ्या व त्यांची बँक खाती मॅनेज करणाऱ्या लोकांचाही नेटवर्कमध्ये समावेश आहे.
 
पुढील स्‍लाइडवर प‍हा, अमिताभ, जयंत सिन्हांसह अन्‍य नावे...,
काय आहे पॅराडाइज पेपर्स..,
जयंत सिन्हा यांनी केलेले ट्वीट्स... 
बातम्या आणखी आहेत...