आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहाल शहाजहांनने बनविलेला मकबरा की शिवमंदिर, CIC ने केंद्र सरकारला विचारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूनेस्कोने 1983 मध्ये ताजमहालला जागतिक वारसास्थळ घोषित केले आहे. - Divya Marathi
यूनेस्कोने 1983 मध्ये ताजमहालला जागतिक वारसास्थळ घोषित केले आहे.
नवी दिल्ली- ताजमहाल शहाजहांने आपली बेगम मुमताज साठी बनविलेला मकबरा आहे की शिव मंदिर, या प्रश्नावर केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) केंद्रीय संस्कृती मंत्रालयाकडे उत्तर मागितले आहे. काही पुस्तकांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही खूप विचारला जाणारा हा प्रश्न आयोगापर्यंत एका आरटीआय अर्जाद्वारे पोहोचला आहे.
 
- अलीकडेच जारी केलेल्या आदेशात माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी म्हटले आहे की, जगातील आश्चर्यांमध्ये समाविष्ट असलेल्या या इमारतीच्या इतिहासावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने स्पष्ट माहिती द्यायला हवी. ताजमहाल कसा बनला आणि त्याबाबत इतिहासकार पी. एन. ओक आणि योगेश सक्सेना यांच्या पुस्तकातील दाव्याबाबत सरकारने माहिती द्यावी.
- या प्रश्नाशी संबंधित काही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयासहित इतर न्यायालयांत खारीज झाली आहेत, तर काही प्रलंबित आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागही या प्रकरणात एक पक्षकार आहे. त्यामुळे संस्कृती मंत्रालयाच्या सल्ल्यावरून त्या विभागाने आपली काहीतरी भूमिका ठरवली असावी. पुरातत्त्व विभागाने 30 ऑगस्टपूर्वी या सर्व शपथपत्रांची प्रत याचिकाकर्त्याला सोपवावी. याबाबत बी. के. एस. आर. अय्यंगार यांनी याचिका दाखल केली होती.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जगातील 7 आश्यर्यांपैकी एक ताजमहाल
बातम्या आणखी आहेत...