आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लार्कचा ते अब्जाधीश होण्यापर्यंतचा प्रवास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानीत दीपक भारद्वाजची हत्या झाल्यानंतर त्याच्या कारकीर्दीवर चर्चा सुरू आहे. सोनिपत जिल्ह्यातील चटिया गावचा रहिवासी दीपकच्या क्लर्क ते अब्जाधीश होण्याचा प्रवास रंजक आहे. दिल्ली सरकारच्या दुय्यम उपनिबंधक कार्यालयात तो लिपिक पदावर कार्यरत होता. काम करत असताना त्याला दिल्लीतील जमिनीसंबंधीच्या कायद्याची माहिती झाली. याच ज्ञानाच्या आधारावर त्याने मालमत्तेचा व्यवसाय केला व अब्जाधीश झाला.

अब्जाधीश होण्याचा साक्षीदार असलेल्या नोकराने सांगितले की, एका बिल्डरने कामाच्या बदल्यात लाखो रुपये दिल्यानंतर दीपकने नोकरी सोडली. या पैशातून त्याने लाजवंती भागात घर खरेदी केले. काही काळासाठी त्याने आॅटो पार्ट्स विकण्याचा व्यवसाय केला. यातूनच तो सामान्य व्यक्तीपासून अब्जाधीश झाला. मात्र, यामुळे त्याचे अनेकांशी भांडणही झाले. एक वेळ अशीही होती की, त्याच्याविरुद्ध कोर्टात मालमत्तेचे 100 हून अधिक खटले सुरू होते.

सरकारी योजनांचा फायदा उठवला: दीपक तलाठ्याकडून सरकारी योजनांची माहिती घेत होता. प्रस्तावित योजनेची माहिती घेतल्यानंतर तो जमिनी खरेदी करत होता. महामार्ग तयार झाल्यानंतर जमिनीचा मोठा मोबदला मिळत होता. त्याने रजोकरीव्यतिरिक्त नजफगढ आणि ढासा भागात जमीन खरेदी केली.

साहिब सिंहसोबतचे संबंध बिघडले : दीपकजवळ रजोकरीमध्ये सुरुवातीपासून 30 एकर जमीन होती. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री,साहिबसिंह वर्मा यांच्याशी त्याचे संबंध चांगले होते.

614 कोटी रुपयांची मालमत्ता
दीपकच्या दिल्ली अपार्टमेंट प्रा. लि. कंपनीमध्ये त्याची पत्नी, मुलगा हितेश आणि नितेश संचालक आहेत. या कंपनीने हरिद्वारमध्ये गंगा टाऊनशिपसाठी वीस एकर जमीन खरेदी केली आहे. रजोकरी भागात त्याच्या दोन हॉटेलचे काम अपूर्ण आहे. द्वारकेत त्याचे भारती पब्लिक स्कूल आहे. स्कूल परिसरात एक बंगलाही आहे. 2009 मध्ये बसपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढताना दीपकने प्रतिज्ञापत्रामध्ये 614 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा उल्लेख केला होता. यातील बहुतांश मालमत्ता या कंपनीच्या मालकीची आहे. याव्यतिरिक्त त्याच्या अनेक कंपन्या आहेत.