आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clash Between Jaylalithaa Manmohan Govt Over Rajiv Gandhi Killers

भुल्‍लरच्या सुटकेची मागणी, राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना सोडण्याचा निर्णय स्थगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांच्या सुटकेचा तामिळनाडू सरकारने निर्णय घेतल्याने केंद्र सरकारच्या अडचणीत भर पडली आहे. तामिळनाडूने घेतलेल्या निर्णयाचे अन्य राज्यातही पडसाद उमटू लागले आहेत. पंजाबमध्ये भुल्लर याच्या सुटकेच्या मागणीने जोर धरला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आज (गुरुवारी) तामिळनाडूच्या निर्णयाला स्थगिती दिली. तामिळनाडू सरकारचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे.

पंजाबमध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने मुख्‍यमंत्री बेअंतसिंग यांचा मारेकरी आणि दहशतवादी देविंदरपालसिंग भुल्लर याच्या सुटकेची मागणी केली आहे.

2012 मध्ये शिरोमणी अकाली दल आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने 1995 मध्ये बेअंतसिंग यांच्या हत्येचा कट रचणार्‍या बलबंतसिंग याला 'जीवित सिख शहीद' असे संबोधले होते. पंजाब कॉंग्रेसचे नेते कॅप्‍टन अमरिंदरसिंग यांनी या मागणीचे समर्थन केले आहे.