आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CBSE 10th: यंदाही मुलांपेक्षा मुलीच अव्वल, 97.32% एकूण निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) अंतर्गत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज (गुरुवार) जाहीर झाला. यंदा 10 वीचा एकूण निकाल 97.32 टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत टक्केवारी 2 टक्क्यांनी घटली आहे. 12 वी प्रमाणे 10 वीतही मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

चंडीगड विभागाचा निकाल उद्या
चंडीगड विभागाचा निकाल शिक्षण मंडळाने राखून ठेवला आहे. या विभागात पाच लाख परीक्षार्थी असून त्यांचा निकाल उद्या (29 मे) दुपारी 12 वाजता घोषित करण्यात येणार आहे.

टॉप थ्री विभाग
तिरुअनंतपुरम - 99.77 टक्के
चेन्नई - 99.03 टक्के
अलाहाबाद - 98.46 टक्के (मागील वर्षी पाटणा विभाग तिसर्‍या स्थानावर होता.)
गुवाहाटी- 86.55 टक्के (सगळ्यात कमी निकाल)

डिजिटल फॉरमॅटमध्ये गुणपत्रिका
सीबीएसई यंदा गुणपत्रिकेची प्रत प्रमाणपत्र छापील डिजिटल प्रकारातही देणार आहे. ती डिजिटल लॉकरमध्ये ठेवता येईल. सरकार मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड आणि रेशन कार्डही डिजिटल स्वरूपात तयार करत आहे.

यंदा देशातील 15,799 शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली. 13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यात 8,17,941 मुले तर 5,55,912 मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात 23 देशांमधील 197 शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सीबीएसई 10वीचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइटसह http://results.bhaskar.com वर देखील पाहाता येईल.

8 जूनपर्यत मार्गदर्शन
सीबीएसईने 12वीचा निकाल सोमवारी (25 मे) जाहीर झाला होता. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दूरध्वनीद्वारे (क्रमांक- 1800 11 8004) मार्गदर्शन करण्‍यात येत आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी 58 तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. 49 भारतातील तर 09 मार्गदर्शक नेपाळ, जपान, सऊदी अरब (दम्माम, ओमान), यूएई (शारजाह, दुबई, रास) आणि कुवेतमधील आहेत. यात सरकारी आणि खासगी शाळांचे प्राध्यापक आणि वरीष्ठ शिक्षकांचा समावेश आहे. 8 जूनपर्यंत सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा निकाल...
बातम्या आणखी आहेत...