आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजेंद्र सिंह मृत्यू प्रकरण : केजरीवाल यांची माफी, कुटुंबाचा क्षमा देण्यास नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / जयपूर - शेतकरी मेळाव्यात राजस्थानचे शेतकरी गजेंद्र सिंह यांच्या आत्महत्याप्रकरणी आपचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी क्षमायाचना केली आहे. मेळाव्यात भाषण सुरू ठेवणे चुकीचे होते. परंतु गजेंद्र यांची मुलगी मेघासह अन्य कुटुंबीयांनी ही क्षमा नाकारली आहे. मेघाशी बोलताना आप नेते आशुतोष टीव्ही कार्यक्रमातच आेक्साबोक्सी रडले.

काँग्रेस आणि भाजपने मात्र केजरीवाल यांना केवळ क्षमा याचना करून भागणार नाही, असे म्हटले आहे. आपने जंतर-मंतरवर भूसंपादन विधेयकाच्या विरोधात सभा घेतली होती. त्यात ४१ वर्षीय गजेंद्र यांनी सभा सुरू असतानाच फाशी घेतली होती. त्यानंतरही नेत्यांची भाषणे सुरूच होती. त्यावरून आप नेत्यावर टीका होत असतानाच केजरीवाल यांनी आपला माफीनामा जारी केला आहे. गजेंद्र यांच्या आत्महत्येनंतरही भाषण सुरू ठेवणे चुकीचे होते. त्यासाठी क्षमा मागतो. माझ्या डोळ्यासमोर ही घटना घडली. मी रात्रभर झोपू शकलो नाही, असे म्हटले. त्यावर टीव्ही कार्यक्रमा अंतर्गत गजेंद्र यांची मुलगी मेघा म्हणाली, माझे वडील तर राहिले नाही. क्षमा याचनेने काय होणार ? माझे वडील आत्महत्या करणाऱ्यापैकी नव्हते.

माझ्या वडीलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. शेतकऱ्याचे मूळ गाव दौसा येथे गजेंद्र यांची बहिण रेखा म्हणाल्या, क्षमा याचनेने काय होणार ? केजरीवाल यांनी घटनेनंतर दोन मिनिटांसाठी देखील सभा रोखली नाही. त्यास कोणीतरी प्रवृत्त केले असावे. त्यामागे षडयंत्र असल्याचा संशय रेखा यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

फाशीनेच मृत्यू झाला : पाेस्टमाॅर्टेम अहवाल
गजेंद्र सिंह यांचा मृत्यू फाशीमुळेच झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली. या प्रकरणी आैपचारिक तक्रारीची वाट न बघता आम्ही त्यावर कारवाई करू, असे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांनी हैदराबादेत सांगितले.

पुढल्यावेळी मुख्यमंत्र्यांना झाडावर चढायला लावू
अरविंदजींनी तत्काळ व्यासपीठावरून खाली येऊन त्यांनी झाडावर चढायला हवे होते. पुढल्या वेळी अशी घटना घडल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना झाडावर चढण्याची आणि व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखण्याची विनंती करेल, असे वक्तव्य आशुतोष यांनी केले होते. त्यावर सोशल मीडियातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. युजरने अनेक प्रकारे आप नेत्यांची टिंगल उडवली.

केजरीवाल तीन दिवस गप्प का? : भाजप
मुख्यमंत्री केजरीवाल तीन दिवस जनता आणि मीडियापासून दूर होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या घटनेवर त्यांनी मौन बाळगले होते. त्यावर प्रश्न निर्माण होतात. मीडियाच्या कव्हरेजवर प्रश्नचिन्ह लावणे हे निंदनीय आहे. लाजिरवाणे आहे.
-सतीश उपाध्याय, अध्यक्ष, दिल्ली भाजप.

केजरीवाल अखेर किती वेळा माफी मागणार ?: काँग्रेस
केजरीवाल अखेर किती वेळा माफी मागणार ? ४९ दिवसांनंतर सरकार सोडण्यात आले. पुन्हा परतल्यानंतर क्षमा याचना केली. आजही तेच करत आहेत. त्यांनी अवलोकन करायला हवे. केवळ क्षमा याचना करून चालणार नाही. अशी परिस्थिती निर्माण का झाली, याचा विचार त्यांनी करायला हवा. सभेच्या आयोजनात काय त्रुटी राहून गेल्या याचा शोध त्यांनी घ्यायला हवा.
अजय माकन, अध्यक्ष, दिल्ली काँग्रेस
पुढे वाचा, टिव्ही कार्यक्रमातच ढसाढसा रडले आशुतोष...