आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • CM Arvind Kejriwal Attack On PM Modi Lg Jung Is Just The Face The Orders Are Coming From Cent 5000.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजरींनी पंतप्रधानांवर डागली तोफ, ट्रेंडमध्ये #ModiMurdersDemocracy

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत 'आप' विरुद्ध 'जंग' सुरु असून राजकीय वातावरण तापले आहे. या वादावर केंद्र सरकारने एका परिपत्रक जारी केले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नियुक्तीवरून व त्यांच्या बदलीचा अंतिम अधिकार नायब राज्यपालांकडेच असल्याचे त्यातून केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच तोफ डागली आहे. केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर घणाघाती आरोपही केले आहेत.

'आप' सरकारची लढाई राज्यपाल जंग यांच्याविरुद्ध नसून मोदी सरकारविरुद्ध आहे. राज्यपाल जंगच्या खांद्यावर बंदूक ठेऊन मोदी सरकार चालवत आहे. सर्व आदेश पीएमओतर्फे दिले जात आहेत. भाजपला आपल्या मर्जीतील अधिकार्‍यांची नियुक्ती करायची आहे. त्यामुळे अधिकार्‍यांच्या बदलीचे सर्व अधिकार स्वत:कडे ठेवण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा घणाघाती आरोप केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.

दिल्लीत भाजपचे फक्त तीन आमदार आहे. त्यांना हाताशी घेऊन राज्यपाल जंग यांच्या माध्यमातून बॅकडोअर शासन करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. मोदींनी दिल्लीतील जनतेचा विश्वासघात केला असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

'आप' सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी कारवायांमुळे भाजप नेत्याचे धाबे दणाणले असून मोदी सरकार अस्वस्थ झाले आहे. एसीबीच्या कारवाईत 36 भ्रष्ट अधिकारी अटकेत असून 152 जण निलंबित करण्‍यात आले. त्यामुळे केंद्र सरकारचे जारी केले परिपत्रक संशयास्पद आहे. केंद्र सरकार भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी यावेळी केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, PM v/s CM: TWITTER वर केजरींचा विजय, ट्रेंडमध्ये आले #ModiMurdersDemocracy