आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर केजरीवालांची कन्या हर्षिताला होऊ शकतो पाच वर्षांचा तुरुंगवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीमधील 'आप' सरकारने सेंच्युरी अर्थात 100 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, या काळात केजरीवाल सरकार या ना त्या कारणांवरून वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे (आप) मूल स्वरूप हरवल्याचा आरोपही होताना दिसत आहे. केजरीवालांची कन्या हर्षिता आयआयटी दिल्लीत 'थर्ड सेम'ची विद्यार्थिनी असून तिला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

हर्षिताने नुकतीच एका आरटीओ अधिकार्‍याला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हर्षिताचे कामविना पैशाने झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका सार्वजनिक सभेत सांगितले. त्यामुळे हर्षिता आता अडचणीत सापडली आहे. या प्रकरणी हर्षिताविरुद्ध दिल्लीत भ्रष्टाचार नियंत्रक शाखेकडे तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. तक्रारीसोबत अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाची सीडी देखील देण्यात आली आहे. हर्षिता विरोधातील तक्रार सत्य निघाल्यास तिला पाच वर्षांचा तुरंगवास होऊ शकतो.

मिळालेली माहिती अशी की, हर्षिता काही महिन्यांपूर्वी 'लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स' बनवण्यासाठी स्थानिक आरटीओ कार्यालय केली होती. परंतु, हर्षिताकडे कागदपत्रे अपूर्ण असल्याचे आरटीओने सांगितले. त्यावर हर्षिताने आरटीओला काही रुपयांचे ‍आमिष दाखवले. मात्र, हर्षिताचे काम विना पैशानेच झाले होते. लाच घेण्यासोबत लाच देणे हा देखील सगळ्यात मोठा गुन्हा मानला जातो. त्यावर भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यातील कलम 12 नुसार तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.
दिल्लीच्या माजी सीएसने दाखल केली तक्रार...
माजी मुख्य सचिव ओमेश सहगल आणि भगत सिंह क्रांतिकारी सेनेचे अध्यक्ष तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी पोलिस आयुक्तांकडे हर्षिता केजरीवाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हर्षिताने आरटीओला लाच देण्याचा प्रयत्न केला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. सोबत हर्षिताचे वडील आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भाषणाची सीडीही सादर करण्‍यात आली आहे.

तक्रारदार ओमेश सहगल आणि तजिंदर पाल सिंह बग्ग यांनी मुख्यमंत्र्यांच्या कन्येविरुद्ध खटला चालवण्याची मागणी केली आहे. तक्रारीची एक प्रत भ्रष्टाचार नियंत्रक शाखेकडे देण्यात आली आहे.

या प्रकरणात लाच घेतली की नाही, मा‍हीत नाही परंतु लाच देण्याचा प्रयत्न झाला आहे. भ्रष्टाचार नियंत्रक कायद्यातील कलम 12 मध्ये लाच देणार्‍या व्यक्तीला पाच वर्षे तुरुंगावासाच्या शिक्षेची तरतुद असल्याचे ओमेश सहगल यांनी म्हटले आहे. परंतु, आरोपी ही मुख्यमंत्री केजरीवाल यांची कन्या असल्यामुळे संबंधित आरटीओ तक्रार देण्यास घाबरत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, हर्षिता केजरीवालचे फोटो...