आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गड, किल्ले पाहण्यास या, जगभरातील पर्यटकांना मुख्यमंत्र्यांकडून अावतण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीदिल्ली- "राज्यातील गड, किल्ले, सागरी किनारे, लोकसंस्कृती बघण्यासाठी आमच्या राज्यात या,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीकर, देश विदेशातील पर्यटकांना शनिवारी निमंत्रण देत ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्षाचा शुभारंभ केला.

दिल्ली हाट येथे राज्य शासनाच्या वतीने १५ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘महाजत्रा’ या सांस्कृतिक, हस्तकला लघु उद्योगाचे दर्शन घडवणाऱ्या महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र शासनाने २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ घोषित केले आहे. देशातील अग्रणी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. राज्याच्या विविध भागांतील हस्तकला, लघु उद्योग आणि राज्याच्या वैविध्यपूर्ण लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या महाजत्रा महोत्सवाचे यशस्वी आयोजन राज्य शासनाच्या विविध विभागांनी केले आहे.’

कलाकारांचा सन्मान
विविधप्रतिमा प्रतिकांच्या माध्यमातून दिल्ली हाटमधे महाराष्ट्र उभे करणाऱ्या प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई, पैठणी तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन या कलेचा प्रचार प्रसार करणारे जितेंद्र राजपूत, राजेंद्र अंकम यांचे महाजत्रा महोत्सवातील हस्तकला प्रदर्शनात सहभागी कलाकारांचे प्रातिनीधी म्हणून प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. महिला उद्योजक विजया, शुभांगी चिपळुणकर यांचा फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.